महिलेच्या पोटातील तब्बल पाच किलो वजनाच्या पासष्ठ गाठी काढल्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महिलेच्या पोटातील तब्बल पाच किलो वजनाच्या पासष्ठ गाठी काढल्या
महिलेच्या पोटातील तब्बल पाच किलो वजनाच्या पासष्ठ गाठी काढल्या

महिलेच्या पोटातील तब्बल पाच किलो वजनाच्या पासष्ठ गाठी काढल्या

sakal_logo
By

महिलेच्या पोटातील पाच किलो
वजनाच्या पासष्‍ट गाठी काढल्या

कोल्हापूर, ता. ८ : पोटामध्ये गाठ असल्याची तक्रार घेऊन पन्नास वर्षांची एक महिला राजारामपुरीतील लोटस जनसाधारण हॉस्पिटलमध्ये दाखल झाली. तपासणी व विविध चाचण्यानंतर ती गाठ फाईब्रॉइड म्हणजेच गर्भाशयाचा ट्यूमर असल्याचे निदर्शनास आले व संपूर्ण उदरातील जागा या गाठीमुळे व्यापली गेली आहे असे लक्षात आले. साधारणतः नऊ महिन्यांच्या गरोदर स्त्रीच्या गर्भाशयाएवढी मोठी ही गाठ होती. त्या महिलेस उच्च रक्तदाब व सौम्य मधुमेह असल्याने शस्त्रक्रिया करणे जोखमीचे होते. लोटस जनसाधारण हॉस्पिटलचे डॉ. निरंजन शहा व त्यांच्या सहकारी डॉक्टर्सनी सर्व वैद्यकीय बाबींची पूर्ण काळजी घेऊन या महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया केली व ती गाठ काढून टाकली. शस्त्रक्रिया करताना असे निदर्शनास आले की गर्भाशयाचा आकार वाढला असून, त्यामध्ये छोट्या-मोठ्या अशा ६५ गाठी आहेत. पाच किलो इतके वजन असणाऱ्या या गाठी काढण्यात आल्या. ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया डॉ. शहा, डॉ. वैशाली, डॉ. सारिका सावंत, भूलतज्ज्ञ डॉ. शिवाजी जाधव, हृदयविकारतज्ज्ञ डॉ. दिलीप कुलकर्णी यांनी यशस्वी केली.