संजीवनी कृषी प्रदर्शनाला प्रतिसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संजीवनी कृषी प्रदर्शनाला प्रतिसाद
संजीवनी कृषी प्रदर्शनाला प्रतिसाद

संजीवनी कृषी प्रदर्शनाला प्रतिसाद

sakal_logo
By

74128
गडहिंग्लज : संजीवनी कृषी प्रदर्शनातील विविध स्टॉल्सवरील माहिती घेण्यासाठी रविवारी शेतकरी व नागरिकांनी गर्दी केली होती.

संजीवनी कृषी प्रदर्शनाला प्रतिसाद
गडहिंग्लजला आयोजन; शेतकऱ्यांनी घेतले प्रगत शेतीचे धडे
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ८ : संजीवनी महिला कृषी विकास व बहुउद्देशीय संस्था व राज इव्हेंटतर्फे आयोजित येथील राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आज गडहिंग्लज विभागातील शेतकरी, तरुण व महिलांनी प्रदर्शनात गर्दी केली होती. शेतकऱ्यांनी विविध स्टॉलला भेट देवून प्रगत शेतीचे धडे घेतले. वि. दि. शिंदे हायस्कूलजवळच्या मैदानावर १० जानेवारीपर्यंत सकाळी आठ ते रात्री दहापर्यंत हे प्रदर्शन चालणार आहे.
ठाकरे शिवसेनेचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्‍घाटन झाले. प्रदर्शनाचे आयोजक राज डावरे यांनी स्वागत करुन प्रदर्शनामागचा हेतू सांगितला. प्रदर्शनाचा आज दुसऱ्या दिवशी गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्यातील शेतकऱ्यांनी भेट दिली. प्रदर्शनातील शेती औजारे, कृषीयंत्र, रोपवाटीका, टिश्यूकल्चर, खते, जंतूनाशके, जलसिंचन, दुध व्यवसाय, पाणी व्यवस्थापन, शेती अर्थ पुरवठा, विमा, अन्न प्रक्रिया आदी स्टॉलवर विशेष भेट देवून शेती तंत्रज्ञानाची माहिती घेतली. कृषी विभागाच्यावतीने विविध योजनांची माहिती शेतकऱ्यांना देण्यात येत होती.
या प्रदर्शनाच्या निमित्ताने नवीन प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतमालाची मांडणी केली होती. उसासह विविध फळपीके, भाजीपाला उत्पादनाची शेतकरी बारकाईने माहिती घेत होते. या शेतमालाच्या स्पर्धेतील विजेत्या शेतकर्‍ऱ्यांना गौरविण्यात येणार आहे. याशिवाय प्रदर्शनात सहभागी शेती व्यतिरिक्त उभारलेल्या स्टॉलनाही प्रतिसाद मिळाला. प्रदर्शनाचे दोन दिवस शिल्लक असून गडहिंग्लज उपविभागातील शेतकऱ्यांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन राज डावरे यांनी केले आहे.