निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निधन
निधन

निधन

sakal_logo
By

02127
महादेव पाटील
02126
जयसिंग पाटील

काही तासाच्या अंतराने
चुलत्या-पुतण्याचे निधन
कसबा बीड : येथील महादेव भाऊसो तुंवर-पाटील (वय ९६) व त्यांचे पुतणे निवृत्त तलाठी जयसिंग बापूसो तुंवर-पाटील (वय ७७) यांचे एकाच दिवशी निधन झाले. महादेव तुंवर-पाटील यांचे पहाटे निधन झाले. त्यांच्या धक्क्याने पुतणे जयसिंग तुंवर-पाटील यांचे सायंकाळी निधन झाले. त्यांच्या मागे एक मुलगा, तीन मुली, सुना नातवंडे असा परिवार आहे. महादेव तुंवर-पाटील यांच्या मागे पत्नी, पाच मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन उद्या सोमवारी (ता. ९) आहे.

01816
रियाज शेख
कोल्हापूर : दौलतनगर येथील रियाज ऊर्फ राजू बापूसो शेख (वय ५२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगी असा परिवार आहे. रक्षाविसर्जन (जियारत) सोमवारी सकाळी १० वाजता आहे.

74153
जयश्री जाधव
कोल्हापूर : हरी ओमनगर येथील जयश्री शंकरराव जाधव (वय ६८) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, मुलगी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी (ता. ९) आहे.

74133
बाळासाहेब लोंढे
कोल्हापूर : उजळाईवाडी येथील बाळासाहेब भाऊसाहेब लोंढे (वय ८५) यांचे निधन झाले. शिवाजी विद्यापीठाचे ते माजी कर्मचारी होते. त्यांच्या मागे पत्नी, मुले, मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवार (ता. ९) आहे.

02340
गोदावरी वाटंगी
चंदगड : येथील गुरुवार पेठेतील गोदावरी चन्नाप्पा वाटंगी (वय १००) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे तीन मुलगे, तीन मुली, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. ११) सकाळी आहे.

74075
इंदूबाई राजीगरे
कोल्हापूर : चुये (ता. करवीर) येथील इंदूबाई मारुती राजीगरे (वय ७२) यांचे निधन झाले. त्या भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंचचे कार्याध्यक्ष युवराज राजीगरे यांच्या आई होत.

02572
महादेव माने
सिद्धनेर्ली : बामणी (ता. कागल) येथील महादेव भाऊ माने (वय ७०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी (ता. ९) बामणी येथे सकाळी आहे.