पाणी टंचाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाणी टंचाई
पाणी टंचाई

पाणी टंचाई

sakal_logo
By

निम्म्या शहराचा
पाणीपुरवठा आज बंद

कोल्हापूर, ता. ८ ः शिंगणापूर अशुद्ध जल उपसा केंद्राकडील ११०० मिलिमीटर व्यासाच्या मुख्य वितरण नलिकेची चंबुखडीजवळ उद्‍भवलेली गळती उद्या दुरुस्त केली जाणार आहे. त्यामुळे सोमवारी (ता. ९) निम्म्या शहरातील पाणी बंद राहणार आहे. मंगळवारीही (ता. १०) अनेक भागात अपुरा पाणीपुरवठा होणार आहे.
शिंगणापूर अशुद्ध जल उपसा केंद्रातून चंबुखडीमार्गे जाणाऱ्या वितरण नलिकेला वीज वितरण कंपनीजवळ मोठी गळती उद्भवली आहे. त्यामुळे रस्त्यावरून पाणी वाहत होते. लाखो लिटर पाणी वाहून जात असल्याने महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने सोमवारी गळती दुरुस्त करण्याचे नियोजन केले. त्यानुसार तयारी करण्यात आली आहे. उद्या सकाळी दुरुस्तीला सुरूवात केली जाणार आहे. त्यामुळे ए, बी, वॉर्ड तसेच ई वॉर्डमधील ज्या भागात दिवसभरात होणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. जवळपास निम्म्या शहराचा पुरवठा बंद राहणार आहे. दिवसभरात दुरुस्ती करून रात्रीपासून उपसा सुरू करण्याचे पाणीपुरवठा विभागाचे नियोजन आहे. यामुळे ज्या भागात सकाळी पाणीपुरवठा केला जातो, त्या भागात मंगळवारीही टंचाई जाणवणार आहे. दोन दिवसांसाठी टँकरद्वारे पाणी वाटपाचे नियोजन केले आहे.