कंदमुळांचा ११/१२ ला कोल्हापुरात उत्सव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कंदमुळांचा ११/१२ ला कोल्हापुरात उत्सव
कंदमुळांचा ११/१२ ला कोल्हापुरात उत्सव

कंदमुळांचा ११/१२ ला कोल्हापुरात उत्सव

sakal_logo
By

‘कंदमुळांचा उत्सव’ प्रदर्शन गुरुवारपासून
कोल्हापूर, ता. ९ : निसर्गात आढळणाऱ्या कंदमुळांची माहिती शहरवासीय, ग्रामीण भागांतील लोकांना व्हावी, यासाठी ‘निसर्ग अंकुर’ यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी (ता. १२) आणि शुक्रवारी (ता. १३) ‘कंदमुळांचा उत्सव’ प्रदर्शन आयोजित केले आहे, अशी माहिती वनस्पती संशोधक डॉ. मधुकर बाचुळकर, मिलिंद धोंड यांनी पत्रकार परिषदेत दिली. हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असून, प्रवेश विनामूल्य आहे.
डॉ. बाचुळकर म्हणाले, ‘‘शहाजी महाविद्यालयात गुरुवारी सकाळी दहा ते रात्री आठ, तर शुक्रवारी सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत प्रदर्शन असेल. प्राचार्य डॉ. अशोक वाली यांनी लिहिलेल्या ‘औषधी रानभाज्या : प्रथम खंड’ पुस्तकाचे प्रकाशन होईल. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्‌घाटन होईल. गडहिंग्लजचे प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे, कृषी अधिकारी उमेश पाटील, माजी प्रभारी कुलगुरू डॉ. डी. आर. मोरे, ‘केएमए’च्या अध्यक्षा डॉ. गीता पिल्लाई प्रमुख उपस्थित राहतील. अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे, अन्य मान्यवर प्रदर्शनाला भेट देणार आहेत.’’
‘कोल्हापूर वुई केअर’चे अध्यक्ष श्री. धोंड म्हणाले, ‘‘कंदांचे संकलन जोयडा (कर्नाटक), वेल्हे (पुणे), गगनबावडा येथून करण्यात येईल. ‘लेट्स गेट बॅक टू अवर रूट्स’ या ब्रिदवाक्यानुसार आरोग्यवर्धक कंदमुळांची माहिती घ्यावी.’’ प्रकल्प व्यवस्थापक सुशांत टक्कळकी, प्रकल्प संचालक अमृता वासुदेवन, प्राचार्य डॉ. अशोक वाली, ‘गार्डन्स क्लब’च्या अध्यक्षा कल्पना सावंत, मंजिरी कपडेकर, पल्लवी कुलकर्णी, मधुरा हावळ उपस्थित होते.