थंडीची हूडहूडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

थंडीची हूडहूडी
थंडीची हूडहूडी

थंडीची हूडहूडी

sakal_logo
By

शहर परिसरात
हुडहुडी...

कोल्हापूर, ता. ९ : दोन दिवस शहर परिसरातील तापमानाचा पारा घसरला. आज तर २२ अंशावर तापमान घसरले आणि शहर परिसराला अक्षरश: हुडहुडी आली.
सायंकाळी सहा नंतर तापमान २२ अंशावर आले असले तरी दुपारी मात्र हेच तापमान २८ अंशापर्यंत होते. सायंकाळी होईल, तशी थंडीची तीव्रता वाढू लागली. रात्री तर १० अंशापर्यंत तापमान घसरेल, अशा नोंदी विविध वेदर संकेतस्थळांवर होती. त्यामुळे थंडी आता पडणार नाही, म्हणून लोकांनी कानटोपी, स्वेटर्स, मफलर वापरणे बंद केले होते. अचानक दोन ते तीन दिवस आलेल्या थंडीमुळे पुन्हा लोकांनी स्वेर्टस, कानटोप्यांचा आधार घेतला.
डॉ. युवराज मोटे म्हणाले, ‘‘उत्तर पर्वतीय प्रदेशात मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी सुरू आहे. परिणामी, उत्तरेकडून दक्षिणेकडे येणारे थंडगार वारे महाराष्ट्रात थंडी घेऊन येत आहे. ही परिस्थिती काही दिवस असेल. मैदानी प्रदेशात जेव्हा १० अंशापर्यंत तापमानाचा पारा घसरतो, तेव्हा थंडीची लाट आली, असे समजले जाते. किनारी प्रदेशातही हीच स्थिती असते. तिथले तापमान जेव्हा चार ते पाच अंशांनी कमी होते, तेव्हा किनारी प्रदेशात ही थंडी वाढते. उत्तरेकडून शीतवाऱ्याचा प्रकोप सध्या सुरू आहे.’’