
संक्षिप्त- स्पर्धा
74412
ब्राह्मण महासंघाच्या
कराओके गीतगायन स्पर्धा
कोल्हापूर :अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ सांस्कृतिक आघाडी आणि स्वरमल्हार कराओके क्लासच्या संयुक्त विद्यमाने नुकत्याच कराओके गीतगायन स्पर्धा झाल्या. लोकमान्य मल्टीपर्पज सोसायटीचे जनसंपर्क अधिकारी राजू नाईक यांच्या हस्ते उदघाटन झाले. दिलीप पाटील, अभय देशपांडे, दिलीप गुणे, शाम जोशी प्रमुख उपस्थित होते.
स्पर्धेमध्ये ८९ स्पर्धकांनी सहभाग घेतला. स्पर्धेमध्ये स्नेहा कोळेकर यांनी पहिला, प्रथमेश कुलकर्णी यांनी दुसरा तर स्वरा आकोळकर यांनी तिसरा क्रमांक पटकावला. डॉ. विनोद ठाकूरदेसाई आणि योगिनी खानोलकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. यावेळी प्रा. डॉ. वर्षा मैंदर्गी, उद्योजक विनय कबनूरकर, ॲड. शिवराम जोशी, अवधूत कबनूरकर, ब्राह्मण महासंघ सांस्कृतिक आघाडी प्रदेशाध्यक्ष अनंत जोशी, जिल्हाध्यक्ष अभय नेर्लेकर, विवेक जोशी, सरोज फडके आदी उपस्थित होते.