Thur, Feb 2, 2023

पोलिस वृत्त
पोलिस वृत्त
Published on : 9 January 2023, 3:58 am
दारू पिऊन अपघातप्रकरणी एकावर गुन्हा
कोल्हापूर ः धैर्यप्रसाद चौक ते ताराराणी पुतळा चौकदरम्यान दारू पिऊन मोटार चालवून अपघात केल्याबद्दल एकावर गुन्हा दाखल झाला. संग्रामसिंह जोतिबा पाटील (वय २९, रा. फ्लॅट नं.२०१, कुसुमेश अपार्टमेंट, ताराबाई पार्क) असे त्याचे नाव आहे. याबाबतची फिर्याद श्रीनिकेतन नितीन कुलकर्णी यांनी दिल्याचे शाहूपुरी पोलिसांनी सांगितले. कुलकर्णी यांच्या मोटारीला शनिवारी (ता. ७) रात्री साडेअकराच्या सुमारास पाटील याच्या मोटारीने धडक दिली. यामध्ये कुलकर्णी यांच्या मोटारीचे नुकसान झाले. त्यामुळे त्यांनी ही फिर्याद दिल्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे.