पंचगंगा प्रदुषणाचा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पंचगंगा प्रदुषणाचा
पंचगंगा प्रदुषणाचा

पंचगंगा प्रदुषणाचा

sakal_logo
By

04632
कोल्हापूर ः पंचगंगा प्रदूषणप्रश्नी माजी खासदार राजू शेट्टी यांनी पालकमंत्री दीपक केसरकर यांची भेट घेतली. शेजारी जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती सावकर मादनाईक.
....
पंचगंगा प्रदूषणाबाबत तत्काळ उपाययोजना करा

राजू शेट्टी : पुढील आठवड्यात बैठक घेण्याचे पालकमंत्र्यांचे आश्वासन

सकाळ वृत्तसेवा

जयसिंगपूर, ता. ९ : डिसेंबरनंतर नदीतील पाण्याचा विसर्ग कमी होऊ लागतो. त्यामुळे साखर कारखाने, कोल्हापूर महापालिका, शिरोली, हातकणंगले, इचलकरंजी औद्योगिक वसाहतीमधील पाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट नदीत सोडले जात आहे. कारखानदार व प्रदूषण विभागातील अधिकारी यांची मिलीभगत असल्याने प्रदूषण विभागाकडून नोटीस देऊनही कोणतीच कारवाई केली जात नसल्याची तक्रार माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे केली. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर शेट्टी यांनी केसरकर यांची भेट घेतली. पंचगंगा नदी प्रदूषणाबाबत पुढील आठवड्यात बैठक घेतली जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री केसरकर यांनी यावेळी दिली.
शेट्टी म्हणाले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने गेल्या अनेक वर्षांपासून पंचगंगा प्रदूषणाबाबत सातत्याने आंदोलन केले आहे. यावर उपाययोजनाबाबत शासनाकडे पाठपुरावा करूनही राज्य शासनाला गांभीर्य नाही. सध्या प्रदूषणाचा प्रश्न गंभीर होत असून पंचगंगा नदीपात्रात मृत माशांचा खच पडू लागला आहे. दोन टनांहून अधिक मासे मृत झाले आहेत. कावीळ व साथीच्या आजाराने पंचगंगा नदीकाठावरील नागरिकांचे आरोग्य पुन्हा धोक्यात येणार आहे. उपाययोजना करण्याऐवजी विविध संघटनांकडून आंदोलन केल्यानंतर अधिकाऱ्यांकडून कार्यकर्त्यांच्यावर ३५३ सारखे गुन्हे दाखल केले जात आहेत. यामुळे शासनाने किमान यावर्षी तरी नागरिकांच्या जीविताशी न खेळता मंत्रालयस्तरावर उपाययोजना करण्याबाबत तातडीची बैठक घेतली पाहिजे.
यावेळी कोल्हापूर जिल्हा परिषदचे माजी बांधकाम सभापती सावकर मादनाईक, नगरसेवक शैलेश चौगुले यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
...