लिगांयत मोर्चाबाबत आवाहन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लिगांयत मोर्चाबाबत आवाहन
लिगांयत मोर्चाबाबत आवाहन

लिगांयत मोर्चाबाबत आवाहन

sakal_logo
By

लिंगायत धर्मियांच्या मुंबईतील
महामोर्चात सहभागी व्हा
अॅड. भोसीकर; इचलकरंजीत बैठक
इचलकरंजी, ता. १० : लिंगायत धर्मियांच्या हक्काच्या मागणीसाठी २९ जानेवारी रोजी मुंबई येथे महामोर्चाचे आयोजन केले आहे. यामध्ये लिंगायत धर्मियातील बंधू-भगीनिंनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीचे अध्यक्ष अॅड. अविनाश भोसीकर यांनी येथे केले. मुंबई येथील मोर्चाच्या प्रचारासाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी लिंगायत धर्मियांच्या बैठका सुरु आहेत. या पार्श्‍वभूमीवर येथील लिंगनगुडीमध्ये समाजाची बैठक झाली. अध्यक्षस्थानी लिंगायत धर्म महासभेचे राज्य सरचिटणीस बी. एस. पाटील होते.
लिंगायत धर्माला संविधानिक मान्यता मिळावी, अल्पसंख्याक दर्जा मिळावा, मंगळवेढ्यातील महात्मा बसवेश्‍वरांचे स्मारक त्वरीत पूर्ण करावे, महात्मा बसवेश्‍वर आर्थिक विकास महामंडळ निर्माण करावे, विधानभवन परिसरात महात्मा बसवेश्‍वरांचा अश्‍वारुढ पुतळा उभारावा या प्रमुख मागण्या असल्याचे अॅड. भोसीकर यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘महात्मा बसवेश्‍वरांचे विचार जोपासण्यासाठी व भावी पिढीच्या हितासाठी शासनदरबारी लिंगायत समाजाची एकी आणि ताकद दाखवण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यासाठी मोर्चा यशस्वी करण्यासाठी लिंगायत धर्मियातील प्रत्येक व्यक्तीने एक दिवस धर्मासाठी द्यावा.
या वेळी लिंगायत धर्म महासभेचे शहराध्यक्ष विलास पाटील, कोल्हापूर शहराध्यक्ष संतोष तोडकर, कोल्हापूर महिला शहराध्यक्षा गीता संजय वडगुले, जिल्हा महिला सचिव वैशाली काशिनाथ माळी, बाळासाहेब सोडगे, सुनिता मुरलीधर कोरे, काशिनाथ माळी, महादेवी सोडगे, शिरोळचे अध्यक्ष मनोज रणदिवे, अजित कागले, हातकणंगले अध्यक्ष शशिकांत पाटील, शहर महिला अध्यक्षा लीना पाटील आदी उपस्थित होते.