Wed, Feb 8, 2023

‘परशुराम’च्या विद्यार्थ्यांची पोलिस स्टेशनला भेट
‘परशुराम’च्या विद्यार्थ्यांची पोलिस स्टेशनला भेट
Published on : 24 January 2023, 3:45 am
74641
गगनबावडा : येथे सहायक पोलिस निरीक्षक रणजित पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या वेळी प्राचार्य रंगराव गोसावी, प्रा. कुंडलिक जाधव उपस्थित होते.
‘परशुराम’च्या विद्यार्थ्यांची पोलिस स्टेशनला भेट
गगनबावडा : पोलिस स्टेशनच्या कामकाजाची माहिती मिळावी यासाठी परशुराम विद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी गगनबावडा पोलिस स्टेशनला भेट दिली. प्राचार्य रंगराव गोसावी, प्रा. कुंडलिक जाधव, दीपक पाटील, स्वाती चौगुले यांनी आयोजन केले. पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक डॉ. रणजित पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. महिला पोलिस उज्ज्वला माने यांनी विद्यार्थ्यांना शस्त्रांबाबत माहिती दिली. या वेळी अनिल पाटील, राजू पाटील, कर्मचारी उपस्थित होते.