किमान आधारभुत किंमत खरेदी योजना
भात, नाचणी
नोंदणीस मुदतवाढ
कोल्हापूर : जिल्ह्यात २०२२-२३ साठी शासनाच्या एफ.ए.क्यू. प्रतीच्या धान (भात) करीता २ हजार ४० व रागी (नाचणी) ३ हजार ५७८ प्रती क्विंटल दर जाहीर केला आहे. जे शेतकरी हमीभाव खरेदी केंद्रावर नोंदणी करु शकले नाहीत ते रविवार (ता. १५) पर्यंत नाव नोंदणी करु शकतात, अशी माहिती जिल्हा मार्केटींग अधिकारी चंद्रकांत खाडे यांनी पत्रकाद्वारे दिली. राज्य शासनाच्या महाराष्ट्र राज्य मार्केटींग फेडरेशनच्यावतीने खरेदीचे काम पाहत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
ज्या शेतकऱ्यांना या धान, नाचणी खरेदी केंद्रावर विक्री करायची आहे अशा शेतकऱ्यांनी या खरेदी केंद्रावर नोंदणी करावी. नोंदणीसाठी शेतकऱ्यांनी चालू हंगाम २०२२-२३ मधील धान (भात), नाचणी पीक लागवडीची ऑनलाईन नोंद असलेला सातबारा, आधारकार्ड व बँक पासबुक झेरॉक्सची आवश्यकता आहे. शेतकरी नोंदणीची मुदत १५ जानेवारीपर्यंत वाढली आहे. माहितीसाठी कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर, गडहिंग्लज अथवा जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालय, शाहू मार्केट यार्ड येथे संपर्क करावा, असेही खाडे यांनी कळविले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.