ऋतुजाचे मॅरेथॉनमध्ये यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ऋतुजाचे मॅरेथॉनमध्ये यश
ऋतुजाचे मॅरेथॉनमध्ये यश

ऋतुजाचे मॅरेथॉनमध्ये यश

sakal_logo
By

ऋतुजाचे मॅरेथॉनमध्ये यश
गडहिंग्लज : दुंडगे (ता. गडहिंग्लज) येथील परिश्रम विद्यालयाची विद्यार्थिनी ऋतुजा जडे हिने राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेत यश मिळवले. मुंबई येथे झालेल्या स्पर्धेत तिने दुसरा क्रमांक पटकावला. डॉ. पतंगराव कदम यांच्या जयंतीनिमित्त सोनहिरा मित्रमंडळाने या स्पर्धेचे आयोजन केले होते. वयोगटानुसार पुरुष व महिला विभागात स्पर्धा झाल्या. बारा वर्षांखालील गटातून ऋतुजा जडे हिने साडेतीन किलोमीटरचे अंतर दुसऱ्या क्रमांकाने पूर्ण केले. भारतीय महिला क्रिकेटपटू जेमिमा रॉड्रिक्स व मुंबईचे नगरसेवक डॉ. विलासराव कदम यांच्याहस्ते रोख पाच हजार रुपये आणि प्रमाणपत्र देऊन गौरवले. तिचे वडील राजू जडे, क्रीडाशिक्षक मदन दंडगीदास यांचे मार्गदर्शन तर मुख्याध्यापक डी. जी. दिवटे यांचे प्रोत्साहन मिळाले.
---------------------------------
gad115.jpg
74757
गडहिंग्लज : रावसाहेब कित्तूरकर कनिष्ठ महाविद्यालयात झालेल्या प्रशिक्षणात बोलताना प्रा. सुभाष कोरे. व्यासपीठावर प्रा. अनिता चौगुले, प्रा. योगेश पाटील आदी.

कित्तूरकरमध्ये गुणवत्ता वाढ प्रशिक्षण
गडहिंग्लज : येथील रावसाहेब कित्तूरकर कनिष्ठ महाविद्यालयात अप्रगत विद्यार्थ्यांचे गुणवत्ता वाढ प्रशिक्षण घेतले. मानसशास्त्र विभागातर्फे आयोजित हे प्रशिक्षण दहा दिवस चालले. प्रशिक्षणापूर्वी अप्रगत विद्यार्थ्यांना मानसशास्त्रीय कसोट्यांचा वापर करुन मानसिक, शारिरीक, भावनिक अडचणी समजून घेतल्या. सर्व विषयाच्या प्राध्यापकांनी जास्त गुण कसे मिळवावेत, पेपर कसा लिहावा, वस्तुनिष्ठ प्रश्न, लघुत्तरी-दीर्घोत्तरी प्रश्न कसे लिहावेत याबाबत मार्गदर्शन केले. यातून विद्यार्थ्यांतील आत्मविश्वास वाढला. प्राचार्य विजय चौगुले यांच्याहस्ते प्रशिक्षणाचे उद्‍घाटन झाले होते. प्रशिक्षणाच्या समारोपात प्रा. सुभाष कोरे यांनी परीक्षेला कसे सामोरे जावे याबाबत मार्गदर्शन केले. प्रा. प्रिया देसाई यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. अनिता कांबळे यांनी आभार मानले.
----------------------------
ओंकार महाविद्यालयात कार्यशाळा
गडहिंग्लज : येथील ओंकार महाविद्यालयात मुलाखत तंत्र व करिअरच्या वाटा आणि सीए, सीएस परीक्षा या विषयावर दोन कार्यशाळा झाल्या. मुलाखत तंत्र या विषयावरील कार्यशाळेत यश सर्व्हिसेसचे अमर झोंड यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थी विकास कक्ष व अर्थशास्त्र विभागातर्फे ही कार्यशाळा झाली. सीएस व सीए परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळेत श्रीराम पाटील यांनी मार्गदर्शन केले. नोडल अधिकारीपदी निवड झाल्याबद्दल डॉ. ज्ञानराजा चिघळीकर यांचा सत्कार केला.
-------------------------
गडहिंग्लजमध्ये जनस्वास्थ अभियान
गडहिंग्लज : येथील गडहिंग्लज हायस्कूलमध्ये जनस्वास्थ दक्षता समिती व जिल्हा मुख्याध्यापक संघातर्फे जनस्वास्थ अभियान झाले. प्राचार्य पंडित पाटील यांनी प्रतिज्ञा दिली. रेखा पाटील यांचे व्याख्यान झाले. शालेय परिसराची स्वच्छता करण्यात आली. खत निर्मिती, भाजीपाला लागवड, सांडपाणी पुनर्वापर, सौरउर्जेचा वापर, निर्धूर चूल, बायोगॅस निर्मिती याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. व्यसनाविरोधात मानवी साखळी करण्यात आली होती.