सीपीआर रूग्णालय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सीपीआर रूग्णालय
सीपीआर रूग्णालय

सीपीआर रूग्णालय

sakal_logo
By

‘सीपीआर’च्या
सफाई कामगारांचा
आंदोलनाचा इशारा

कोल्हापूर , ता. ११ ः सीपीआर रूग्णालयातील डीएम कंपनीच्या सफाई कामगारांच्या मागण्या शुक्रवारपर्यंत मान्य न केल्यास सोमवार (ता.१६) पासून उपोषण करण्यात येईल, असा इशारा सफाई कामगार व सर्व श्रमीक संघाने पत्रकाद्वारे दिला.
सीपीआरमध्ये खासगी कंपनीकडून सफाई कामाचा ठेका चालवला जातो. यात खासगी कंपनीकडे काम करणाऱ्या कामगारांना कामावरून काढून नवीन कामगार भरले तसेच कामगारांना किमान वेतन देण्यात येत नाही. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून कामगारांनी आंदोलन केले. तसेच आम्हाला किमान वेतन देऊन कामावर घ्यावे अशी मागणी केली होती. त्यानुसार सीपीआरच्या अधिष्टातांसमोर संबधित ठेकेदाराने १ जानेवारीपासून संबंधित कामगारांना कामावर घेण्याचे अश्वासन दिले. त्यामुळे तेव्हा कामगारांनी आंदोलन स्थगित केले. मात्र, कामगार कामावर आल्यानंतर त्यांना कंत्राटदारांकडून विविध पातळ्यांवर अडवणूक सुरू केली आहे. किमान वेतन देणे ही टाळले जात आहे. त्यामुळे कंत्राटदारांनी अधिष्टाता समोर दिलेली माहिती खोटी ठरत आहे. त्यामुळे वेतन वाढ करणे तसेच कामगारांना कामावर घेणे या दोन्ही मागण्या कराव्यात अशी मागणी कामगारानी केली आहे. या आंदोलनाचे नेतृत्व कामगार नेते अतुल दिघे करीत आहेत.