तुरुंगाधिकाऱ्याला १३ पर्यंत पीसी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तुरुंगाधिकाऱ्याला १३ पर्यंत पीसी
तुरुंगाधिकाऱ्याला १३ पर्यंत पीसी

तुरुंगाधिकाऱ्याला १३ पर्यंत पीसी

sakal_logo
By

74931

तुरुंगाधिकारी योगेश पाटीलला अटक
लैगिंक अत्याचारप्रकरणी शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ११ : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती (कळंबा) कारागृहातील अटक केलेल्या तुरुंगाधिकाऱ्याला आज, बुधवारी न्यायालयाने शुक्रवार, १३ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. योगेश भास्कर पाटील (रा. कळंबा मध्यवर्ती कारागृह क्वॉटर्स) असे अटक केलेल्या संशयित तुरुंगाधिकाऱ्याचे नाव आहे. महिलेवर लैंगिक अत्याचार करून जातिवाचक शिवीगाळ केल्यामुळे त्याला मंगळवारी रात्रा त्याला अटक केली. जुना राजवाडा पोलिस ठाण्यात याची नोंद झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. पीडित महिलेने फिर्याद दिल्यावर हा गुन्‍हा दाखल झाला असून शहर पोलिस अधीक्षक मंगेश चव्हाण तपास करत आहेत.
लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार पीडित महिलेने दिल्यानंतर पोलिसांनी कळंबा कारागृहातील तुरुंगाधिकारी (वर्ग १) योगेश पाटील याला अटक केली. त्याने डिसेंबर २०२१ ते ९ जानेवारी २०२३ दरम्यान तिच्यावर अत्याचार केल्याचे पीडितेच्या तक्रारीत म्हटले आहे.
तुरुंगाधिकारी पाटील याला आज, बुधवारी विशेष न्यायालयात हजर केले. तेथे सरकारी वकिलांनी वैद्यकीय तपासणीसह अन्य कारणास्तव संशयितास सात दिवस पोलिस कोठडी देण्याची मागणी केली. अखेर दोन्हीबाजूच्या युक्तीवादानंतर न्यायालयाने त्याला १३ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. त्यामुळे त्याला राजारामपुरी पोलिस ठाण्याच्या कोठडीत ठेवण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
---------
कारागृह कृत्ये पुन्हा चर्चेत
कळंबा मध्यवर्ती कारागृहात साधारण पंधरा वर्षांपूर्वी कारागृहातील अधीक्षकाला महिलेची छेड काढल्याप्रकरणी मारहाण झाली होती. त्याच्यावरही जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर कारागृहात गांजा, पार्टी, मोबाईल हॅण्डसेट सापडणे असे अनेक प्रकार घडत आहेत. यानिमित्ताने कळंबा मध्यवर्ती कारागृह पुन्हा पुन्हा चर्चेत येत आहे.
------------