कुलगुरू शिर्के फेलो ऑफ सोसायटी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुलगुरू शिर्के फेलो ऑफ सोसायटी
कुलगुरू शिर्के फेलो ऑफ सोसायटी

कुलगुरू शिर्के फेलो ऑफ सोसायटी

sakal_logo
By

कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांना
‘फेलो ऑफ दि सोसायटी’ पुरस्कार

कोल्हापूर, ता. १२ ः इंडियन सोसायटी फॉर प्रॉबॅबिलिटी अँड स्टॅटिस्टिक्सतर्फे शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू आणि ज्येष्ठ संख्याशास्त्रज्ञ डॉ. दिगंबर शिर्के यांना ‘फेलो ऑफ दि सोसायटी’ हा सन्मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ‘संख्याशास्त्र आणि वारंवारिता क्षेत्राच्या प्रगती आणि विकासात दिलेल्या लक्षणीय योगदाना’बद्दल हा पुरस्कार बहाल करण्यात येत असल्याचे संस्थेच्या प्रमाणपत्रात म्हटले आहे.
आंध्र प्रदेशातील तिरुपती मुख्यालय असणाऱ्या इंडियन सोसायटी फॉर प्रॉबॅबिलिटी अँड स्टॅटिस्टिक्स (आयएसपीएस) आणि कोचीन येथील कोचीन युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने कोचीन येथे संस्थेची ४२ वी वार्षिक परिषद झाली. यावेळी हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्याचे नियोजन होते. तथापि, या काळात पूर्वनियोजित महत्त्वपूर्ण बैठकीस उपस्थित राहावयाचे असल्याने कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या अनुपस्थितीत पुरस्काराची घोषणा केली. नुकतेच डॉ. शिर्के यांना या पुरस्काराचे मानपत्र व प्रमाणपत्र मिळाले आहे.

कोट
संख्याशास्त्र विषयामध्ये कार्य करणाऱ्या ‘आयएसपीएस’सारख्या अत्यंत आघाडीच्या संस्थेने दाखविलेल्या या विश्वासामुळे जबाबदारी वाढली आहे. ३५ वर्षांमध्ये शिक्षक, संशोधक म्हणून जे योगदान देत राहिलो, त्याचे फलितस्वरूप म्हणजे हा पुरस्कार आहे. मी अत्यंत कृतज्ञ भावनेने तो स्वीकारत आहे. माझे या क्षेत्रातील सहकारी, संशोधक आणि विद्यार्थी यांचेही यामध्ये महत्त्वाचे सहकार्य आहे. त्या सर्वांनाही या क्षणी धन्यवाद देतो.
-डॉ. दिंगबर शिर्के, कुलगुरू