गौण खनिज उत्खनन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गौण खनिज उत्खनन
गौण खनिज उत्खनन

गौण खनिज उत्खनन

sakal_logo
By

बेकायदेशीर उत्खनन करणाऱ्यांचा गॉडफादर कोण?
अनेकांचे धाबे दणाणले :उत्खनन थांबले तात्पुरते

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १२ : शहरातील इमारतींचे बांधकाम करताना काढलेल्या बेसमेंटमध्ये बेकायदेशी उत्खनन झाले आहे. ज्यांनी बेकायदेशीर उत्खनन केले, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याऐवजी रॉयलटी भरुन घेवून अशा लोकांना पाठिंशी घालणाऱ्यांमागचे गॉडफादर कोण आहे? याची चौकशी होणे आवश्यक आहे. ‘सकाळ’मधून ‘कारवाईऐवजी रॉयल्टी भरुन पाठराखण’ या मथळ्याखाली वृत्तप्रसिध्द केले. यामुळे अनेकांचे धाबे दणाणले. ज्यांनी चुकीचे काम केले आहे. त्यांची दिवसभर तडफड सुरु होती. जिल्हा प्रशासनाकडून अशा लोकांची आणि अधिकाऱ्यांची चौकशी करावी लागणार आहे. दरम्यान, याप्रकरणी चौकशी करण्याच्या सूचना तहसिलदार यांना दिल्या जातील, अशी माहिती प्र. जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी दिली.
शहरातील बांधकामावेळी बेसमेंट काढताना माती, मरुमाचे उत्खनन करताना प्रशासनाकडून परवानगी घ्यावी लागते. मात्र, ठराविक ब्रास उत्खननची परवानगी घ्यायची आणि दुपटीने उत्खनन करायचे, असा प्रकार सुरू आहे. यावावत चौकशी करायची, नोटीसा द्यायचे आणि दंड करण्याच्या वेळी पुन्हा रॉयलटी भरुन घ्यायची असा प्रकार थांबणार कधी? असा सवाल उपस्थित होत आहे. त्यांचा गॉडफादर कोण आहे. याचीही चौकशी झाली पाहिजे. ‘सकाळ''च्या वृत्तानंतर शहर व शहर परिसरातील बेकायदेशी उत्खनन करणाऱ्यानी आज दक्षता बाळगली, काही ठिकाणी उत्खनन थांबवले.

.....

गौण खनिज उत्खननाची परवानगी तहसिलदारकडून दिली जाते. दरम्यान, याबद्दल बेकायदेशीर उत्खनन झाले आहे का?, याची चौकशी करण्याच्या सूचना दिल्या जातील. - संजय शिंदे, प्र. जिल्हाधिकारी