- | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

-
-

-

sakal_logo
By

कनिष्ठ अभियंत्याला माजी नगरसेवकाकडून ठार मारण्याची धमकी
कोल्हापूर, ता. ११ : गरज असलेल्या ठिकाणी डांबरीकरण का केले नाही, अशी विचारणा करत महापालिकेच्या एका कनिष्ठ अभियंत्याला माजी नगरसेवकाने शिवीगाळ करत रोलरखाली टाकून ठार मारण्याची धमकी दिल्याचे समजते. यानंतर कनिष्ठ अभियंत्याने पळ काढला. शहराच्या मध्यवस्ती सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी सायंकाळी घडलेल्या या घटनेमुळे कर्मचाऱ्यांत भितीचे वातावरण पसरले आहे. तसेच या घटनेबाबत तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत रात्री उशीरापर्यंत पोलिसांत नोंद झालेली नव्हती.