कंदमुळे उत्सवास प्रारंभ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कंदमुळे उत्सवास प्रारंभ
कंदमुळे उत्सवास प्रारंभ

कंदमुळे उत्सवास प्रारंभ

sakal_logo
By

75159
कोल्हापूर : कंदमुळे प्रदर्शनाचे उद्‍घाटन कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या हस्ते झाले. या वेळी प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे, उमेश पाटील, गीता पिल्लई, प्राचार्य मधुकर बाचूळकर डॉ. अशोक वाली, डी. आर. मोरे, मिलिंद धोंड, जयेश ओसवाल. (मोहन मेस्त्री : सकाळ छायाचित्रसेवा)

पारंपरिक शेतीबरोबरच कंदमुळ लागवड करा
कुलगुरु डॉ. डी. टी. शिर्के; कंदमुळांच्या प्रदर्शनाचे उद्‍घाटन
कोल्हापूर, ता. १२ : ‘‘निसर्गात उपलब्ध असणाऱ्या कंदमुळांची ओळख आणि माहिती सगळ्यांना होण्यासाठी, असे प्रदर्शन भरवणे आवश्यक आहे. पारंपरिक शेतीबरोबरच शेतकऱ्यांनी कंदमुळे आपल्या शेतीत लावावी,’’ असे आवाहन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. डी. टी. शिर्के यांनी केले.
दुर्मिळ रानकंदमुळांची ओळख, आहारातील वापराबद्दलची माहिती व्हावी या हेतूने ‘निसर्ग अंकुर’च्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर वुई केअर, एनजीओ कंपॅशन २४ संस्थेने कंदमुळांचे प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. कुलगुरु डॉ. शिर्के यांच्या हस्ते याचे उद्‌घाटन झाले. या वेळी ते बोलत होते. श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्था, गार्डन्स क्लब, वुई केअर हेल्पलाईन, युथ एनेक्सतर्फे शहाजी कॉलेजमधील यशवंतराव चव्हाण सभागृहात कंदमुळांच्या या उत्सवास प्रारंभ झाला.
उद्यापर्यंत (ता. १३) हे प्रदर्शन असेल. सकाळी १० ते सायंकाळी पाचपर्यंत प्रदर्शन खुले राहील. आज दिवसभर शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी, विज्ञानाचे विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिकांनी कंद पाहण्यासाठी गर्दी केली. डॉ. शिर्के म्हणाले, ‘‘शिवाजी विद्यापीठातील तज्ज्ञ आणि आयोजकांनी एकत्र येऊन कंदमुळांच्या संशोधनावर भर देऊन त्याची प्रायोगिक तत्वावर शेती करावी. कंदमुळांच्या पेटंटवर चर्चा करून भविष्यात असे प्रकल्प साकारू या.’’
‘कोल्हापूर वुई केअर’चे अध्यक्ष मिलिंद धोंड यांनी सूत्रसंचालन केले. ‘गडहिंग्लज’चे प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे, डॉ. डी. आर. मोरे, कृषी अधिकारी उमेश पाटील, डॉ. मधुकर बाचूळकर, शहाजी कॉलेजचे प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण, मोहन माने, ‘केएमए’च्या अध्यक्ष गीता पिल्लाई, मंजिरी कापडेकर, कल्पना सावंत, अमृता वासुदेवन, जयेश ओसवाल, सुशांत टकळक्की प्रमुख उपस्थित होते.
--------------
चौकट
अबब... केवढे मोठे कंद..!
प्रदर्शनात ६० पेक्षा अधिक कंदमुळे ठेवली आहे. शेतीत लागवड केलेली ही कंदमुळे आहेत. यामध्ये पिल्ला कोन, मुन्द चिरके, कणगा, काटे कणग, कोराडू, उंडे, शेंडवाळे, आडकोळी, तांबडे कणवाल, तांबडे सावर, सुकाळी कोन सारख्या दुर्मिळ कंदमुळांचा समावेश आहे. ६० प्रकारच्या कंदांपैकी १५ ते २० प्रकारचे कंद विक्रीसाठी उपलब्ध आहेत. खूप लोकांनी असे कंद विकत घेतले. सुमारे सहा ते सात प्रकारच्या कंदाच्या पाककृतीची माहिती उपस्थितांना दिली.
----------
कंदांची चव अफलातून..
ज्या शेतकऱ्यांनी हे कंद आणले होते. त्यातील काही कंदांच्या पाककृती प्रदर्शनासमोर सुरु होत्या. कंद निवडणे, उकडणे, पाककृती करणे, पाककृती झाली की, समोरील ग्राहकांना देणे सुरु होते. ज्यांनी कुणी हे कंद खाल्ले, त्यांनी तर ‘अफलातून’ अशी प्रतिक्रिया दिली.