- | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

-
-

-

sakal_logo
By

२६३९
अविनाश कोळी

अविनाश कोळी शिरोलीचे उपरपंच
शिरोली पुलाची : येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी अविनाश अनिल कोळी यांची बिनविरोध निवड झाली. निवडसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच पद्मजा करपे होत्या. निवडणुकीत सरपंचपदासह १६ जागांवर विजय मिळवत महाडिक आघाडीने एकहाती सत्ता मिळवली आहे. माजी आमदार महादेवराव महाडिक, अमल महाडिक व गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी शाहू आघाडीतून महाडिक आघाडीत प्रवेश केलेल्या अविनाश कोळी यांच्यावर उपसरपंचपदासाठी विश्‍वास दाखवला. उपसरपंचपदासाठी कोळी यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा सरपंच करपे यांनी केली. माजी आमदार अमल महाडिक व सरपंच पद्मजा करपे यांच्या हस्ते कोळी यांचा सत्कार झाला.
-------------------
02448
सुधीर पाटील

सुधीर पाटील नागावचे उपसरपंच
नागाव : नागाव (ता. हातकणंगले) उपसरपंचपदी सुधीर ऊर्फ बंटी सुभाष पाटील यांची निवड करण्यात आली. ते पाटील पॅनेल व विकास आघाडीच्या संयुक्त आघाडीचे उमेदवार आहेत. सरपंच विमल अनिल शिंदे या निवड सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. ग्रामविकास अधिकारी शेलार व निवडणूक निरीक्षक म्हणून लालसिंग यांनी काम पाहिले. या वेळी सदस्य राजेंद्र यादव, अजित घाटगे, संगीता वायदंडे, श्रेयस नागावकर, मंगल चव्हाण, संगीता कोळी, अभिनंदन सोळांकुरे, शुभांगी पवार, अश्‍विनी माळी, मोसमी कांबळे, अक्षय कांबळे, वारणा कारखान्याचे संचालक सुभाष पाटील, महावीर पाटील, पंचायत समिती सदस्य उत्तम सावंत, गुंडा सावंत, पुरंदर शिरगावे, संजय शिंदे, संजय वडार, शामराव मोरे, अमित नांगरे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होत, तर विरोधी विकास आघाडीचे पाच सदस्य अनुपस्थित राहिले.
---------------
02129
जयसिंग सुर्यवंशी

सुर्यवंशी कसबा बीडचे उपसरपंच
कसबा बीड : येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी जयसिंग यशवंत सुर्यवंशी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. अध्यक्षस्थानी सरपंच उत्तमराव वरूटे होते. येथील निवडणुकीमध्ये विरोधी जनसेवा परिवर्तन आघाडीचे उमेदवार शिवसेना चंद्रदीप नरके गटाचे कुंभी कासारी साखर कारखान्याचे संचालक उत्तम पांडुरंग वरूटे यांनी सत्ताधारी ग्रामविकास आघाडीचे उमेदवार बाजार समितीचे माजी उपसभापती शामराव सुर्यवंशी यांचा पराभव केला होता. सत्ताधारी गटाचे नऊ उमेदवार निवडून आले, तर विरोधी गटाने दोन जागा जिंकल्या. यावेळी सदस्य सागर पाटील,
माधुरी पाटील, विजय गावडे, संतोष पाटील, रंजना तिबिले, अंजना कुंभार, सरिता खांडेकर, माया जोगडे, महेश जोगडे, प्रियांका जाधव, ‘गोकुळ’चे माजी संचालक सत्यजीत पाटील, राजेंद्र सुर्यवंशी, डी. एम. सुर्यवंशी, सर्जेराव सुर्यवंशी, सर्जेराव तिबिले, सरदार जाधव, ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामविकास अधिकारी महेश खराडे यांनी आभार मानले.
--------------
04157
सतिश निर्मळ

कंदलगाव उपसरपंचपदी सतिश निर्मळ
कंदलगाव : येथील ग्रामपंचायत उपसरपंचपदी सतिश निर्मळ यांची बिनविरोध निवड झाली. सरपंच राहूल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासक व्ही. के. पाटील व ग्रामविकास अधिकारी अशोक मुसळे यांच्या उपस्थितीत उपसरपंचपदाची निवड झाली. पॅनेल प्रमुख वसंत पाटील व सर्व सदस्य, कर्मचारी उपस्थित होते.

04155
संजय शिंदे

पाचगाव उपसरपंचपदी संजय शिंदे..
कंदलगाव : पाचगाव ग्रामपंचायतमध्ये काँग्रेसकडे सरपंचपदासहित १०, तर भाजपकडे आठ सदस्य असल्याने उपसरपंचपदासाठी कॉंग्रेसकडून संजय शिंदे, तर भाजपकडून स्वरा गाडगीळ यांच्यात रस्सीखेच झाली. यामध्ये काँग्रेसची दोन मते वाढल्याने उपसरपंच पदासाठी १० विरूध्द आठ असे मतदान होवून संजय शिंदे यांनी उपसरपंचपदी बाजी मारली. सरपंच प्रियंका पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व प्रशासक बी. एल. जाधव यांच्या उपस्थितीत निवडणूक प्रक्रिया झाली. माजी सरपंच संग्राम पाटील, कोअर कमिटी अध्यक्ष नारायण गाडगीळ, संजय पाटील, तंटामुक्तीचे शिवाजी ढेरे, सेवा सोसायटीचे चेअरमन चंद्रकांत सस्ते उपस्थित होते.
--------------
04151
दत्तात्रय भिलुगडे

मोरेवाडी उपसरपंचपदी भिलुगडे
कंदलगाव : मोरेवाडी उपसरपंचपदी दत्तात्रय भिलुगडे यांची बिनविरोध निवड झाली. सरपंच आनंदा कांबळे निवड सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. निरीक्षक आशिफ सय्यद, ग्रामविकास अधिकारी आर. सी. पाटील यांच्यासह सर्व सदस्य, कर्मचारी उपस्थित होते.
----------------
01718
उदय जाधव

कळंबा उपसरपंचपदी उदय जाधव
कळंबा : येथील कळंबे तर्फ ठाणे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी उदय नारायण जाधव यांची बिनविरोध निवड झाली. लोकनियुक्त सरपंच सुमन गुरव यांच्या अध्यक्षतेखाली निवड प्रक्रिया झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामविकास अधिकारी दिलीप तेलवी होते. उपसरपंच पदासाठी जाधव यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक अधिकारी तेलवी यांनी घोषित केले. या वेळी जाधव यांचा सत्कार तलाठी पुरुषोत्तम ठाकूर व सरपंच सुमन गुरव यांच्या हस्ते झाला. या वेळी सदस्य रोहित मिरजे, संदीप पाटील, विकास पोवार, सोनल शिंदे, रोहित जगताप, आशा टिपुगडे, संगीता माने, स्नेहल जाधव, वैशाली टिपुगडे, पुनम जाधव, मीनाक्षी गौड, दिपाली रोपळकर आदी उपस्थित होते.