खासगी सावकारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खासगी सावकारी
खासगी सावकारी

खासगी सावकारी

sakal_logo
By

टाकळवाडीत खासगी सावकरांवर कारवाई
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १२ : टाकळवाडी (ता. शिरोळ) येथे खासगी सावकारी करणाऱ्या तिघांवर कायदेशीर कारवाई केली आहे. धनपाल निगाणा भमाणे, सदाशिव धनपाल भमाणे व अजित आम्माण्णा गोरवाडे (सर्व रा. टाकळीवाडी, ता. शिरोळ) यांच्याविरुद्ध ही कारवाई केल्याचे जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांनी पत्रकाद्वारे कळवले आहे.
खासगी सावकारी करणाऱ्यांबद्दल जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार ही कारवाई झाली आहे. कारवाईमध्ये ५० व १०० रुपयांचे स्टँप पेपरवरील ६ करारपत्र, ९ खरेदीखत असे महत्त्‍वपूर्ण दस्तऐवज जप्त केल्याचे शिंदे यांनी नमूद केले आहे.
महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियमाअंतर्गत जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने उपनिबंधक शिंदे यांच्या मागर्दशनाखाली दोन ठिकाणी झडती घेतली. यामध्ये हातकणंगले येथील सहकारी अधिकारी आर. जी. कुलकर्णी, शिरोळ येथील सहकारी अधिकारी व्ही. व्ही. वाघमारे यांच्या पथकाने ती पूर्ण केली. खासगी सावकर (गैरअर्जदार) अजित गोरवाडे हा बाहेरगावी असल्याने त्यांचे राहते घर सिल केले आहे. धनपाल भमाणे व सदाशिव भमाणे यांच्या राहत्या घरातून ५० व १०० रुपयांचे स्टँप पेपरवरील ६ करारपत्र, ९ खरेदी खते असे दस्तऐवज जप्त केले. या कारवाईसाठी सहकार विभागाचे २ अधिकारी व १४ कर्मचारी असे १६ कर्मचाऱ्यांची व पोलिस अधिकारी व ४ पोलिस कॉन्स्टेबल यांची नियुक्ती केली होती. जप्त केलेले अवैध सावकारीचे दस्त ऐवज, करारपत्रे यांच्या चौकशीचे काम सुरू आहे. अवैध सावकारीमुळे आर्थिक पिळवणूक अगर स्थावर मालमत्ता, शेती, जमीन सावकाराने बळकाविली असल्यास जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था कार्यालयास संपर्क साधण्याचे किंवा तक्रार अर्ज सादर करण्याचे आवाहन शिंदे यांनी केले आहे.