केएमटी संप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

केएमटी संप
केएमटी संप

केएमटी संप

sakal_logo
By

केएमटी कर्मचाऱ्यांचा
काम बंदचा इशारा
कोल्हापूर, ता. १२ ः केएमटीकडील कर्मचाऱ्यांनी अनेक वर्षे स्वतःवर अन्याय सोसून सुरळीत सेवा दिली आहे. कमी कर्मचारी, कमी बस व इतर असुविधा असतानाही कार्यरत आहेत. पण अतिरेक झाल्याने प्रलंबित तीन मागण्यांची पूर्तता महिन्यात पूर्ण केल्यास कोणत्याही क्षणी कामबंद आंदोलन केले जाईल, अशी नोटीस म्युनिसिपल ट्रान्स्पोर्ट वर्कर्स युनियनने प्रशासनाला दिली आहे.
नोटीसमध्ये म्हटले आहे, महानगरपालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग फरकासह लागू झाला. पण केएमटी विभागास मात्र वेतन आयोग लागू करण्यास टाळाटाळ करण्यात आली आहे. सातवा वेतन आयोग लागू करावा. रोजंदारी कर्मचारी २५ ते ३० वर्षे काम करतात. त्यांना कायम केलेले नाही. बिंदू नामावली (रोस्टर) तपासून २ महिने झालेले असतानाही त्यांना कायम ऑर्डर दिलेल्या नाहीत. त्या त्वरित द्याव्यात. शेड्यूलप्रमाणे रिक्त जागेवरच पदोन्नती देण्यात यावी. पदोन्नती देताना ऑफिस, ट्रॅफिक, वर्कशॉप यातील सर्व कर्मचाऱ्यांना सम प्रमाणात पदोन्नती देण्यात यावी. या तीन मागण्यांची पूर्तता महिन्यामध्ये न झाल्यास कोणत्याही क्षणी काम बंद आंदोलन करण्यात येईल.
अध्यक्ष प्रमोद पाटील, जनरल सेक्रेटरी इरशाद नायकवडी, तज्ज्ञ संचालक अनिल कदम यांनी प्रशासक, अतिरिक्त आयुक्त तसेच अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक यांना निवेदन दिले आहे.