Tue, Feb 7, 2023

वॉक
वॉक
Published on : 13 January 2023, 7:12 am
कोल्हापूर-पन्हाळागड
आत्मक्लेश वॉक आज
कोल्हापूर, ता. १३ ः छत्रपती आणि महापुरुषांच्या सन्मानासाठी उद्या (ता. १४) छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पन्हाळागड हा आत्मक्लेश वॉक काढण्यात येणार आहे. त्याचे परीख पूल नुतनीकरण समितीने आयोजन केले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून सकाळी सात वाजता अभिवादन करून वॉक सुरू होईल.पन्हाळागडावरील तीन दरवाजा तटबंदीवर संपणार आहे. तटबंदीवर ७० फूट बाय ५ फुटाचा बॅनर धरून अविचारी उद्गारांबाबत इशारा देण्यात येणार आहे. यापुढे अशी विधाने करणाऱ्यांना माफी न देता गुन्हे दाखल करण्यात यावेत, कोर्टाने शिक्षा द्यावी, अशी मागणी करण्यात येणार आहे.पन्हाळगडावरील छत्रपती संभाजीराजे यांच्या मंदिरावर, ऐतिहासिक भिंतीवर उगवलेली झाडे-झुडपे हटवण्याबाबत पुरातत्व खाते, पन्हाळा नगरपरिषदेस निवेदनही दिले जाणार आहे.