कोवाडे येथे घुगऱ्याचा कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोवाडे येथे घुगऱ्याचा कार्यक्रम
कोवाडे येथे घुगऱ्याचा कार्यक्रम

कोवाडे येथे घुगऱ्याचा कार्यक्रम

sakal_logo
By

आंबिल घुगऱ्याचा
कोवाडे येथे कार्यक्रम
भादवण, ता. १३ : कोवाडे (ता. आजरा) येथे रेणुकादेवीच्या जागराचा कार्यक्रम झाला. या वेळी आंबिल घुगऱ्या महाप्रसादाचे वाटप झाले. कोवाडे पंचक्रोशीतील रेणुका भाविक मोठ्या संख्येने एकत्र आले होते. देवाची आराधना व पुजा पाठ यासह धार्मिक कार्यक्रम झाले. उदो.. उदोने परिसर भारावून गेला होता.
दर पाच वर्षांनी गावात आंबिल घुगऱ्याचा कार्यक्रम होतो. लोकवर्गणी जमा करून या कार्यक्रमाचा खर्च भागवला जातो. दशरथ हुंदळेकर, शिवाजी हुंदळेकर, बाळासाहेब हुंदळेकर, संजय हुंदळेकर व राजू हुंदळेकर यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम झाला. गुरुवर्य रामु दादू कांबळे यांच्या आर्शिवादाने सिंधुताई बाळकू हुंदळेकर, कंबुबाई बसाप्पा कांबळे यांनी धार्मिक विधीमध्ये सहभाग घेतला. गावातून देवीच्या रेणुकादेवीच्या प्रतिमेची मिरवणुक काढण्यात आली. या वेळी भंडाऱ्याची उधळण झाली. सोनाबाई कदम (कर्पेवाडी) यांनी देवीच्या महतीचे गाणी गाईली व जागर केला. या वेळी ग्रामस्थ, भाविक उपस्थित होते.