जिल्‍हा परिषद कर्मचारी सोसाटयीसाठी आज मतदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्‍हा परिषद कर्मचारी सोसाटयीसाठी आज मतदान
जिल्‍हा परिषद कर्मचारी सोसाटयीसाठी आज मतदान

जिल्‍हा परिषद कर्मचारी सोसाटयीसाठी आज मतदान

sakal_logo
By

जिल्‍हा परिषद
... लोगो
....

कर्मचारी सोसायटीसाठी आज मतदान
---
शहाजी महाविद्यालयात नियोजन; उद्या निकाल
सकाळ वृत्तसेवा
कोल्‍हापूर, ता. १४ : जिल्‍हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उद्या (ता. १५) मतदान होत आहे. दसरा चौक येथील शहाजी महाविद्यालयात सकाळी आठ ते सायंकाळी पाच या वेळेत हे मतदान होईल. श्री महालक्ष्‍मी सहकार सत्तारूढ पॅनेल विरुद्ध राजर्षी शाहू स्‍वाभिमानी आघाडीत ही लढत होत आहे. मागील १५ दिवसांपासून प्रचाराचा धुरळा उडाला असून, आरोप- प्रत्यारोपांनी ही निवडणूक चांगलीच गाजली. निवडणुकीचा निकाल सोमवारी (ता. १६) जाहीर होणार आहे. या निवडणुकीत एकूण दोन हजार ५२६ मतदार आपला मतदानाचा हक्‍क बजावणार आहेत.
या वेळची जिल्‍हा परिषद कर्मचारी सोसायटीची निवडणूक अनेक अर्थाने चर्चेत राहिली आहे. या वेळी दोन्‍ही पॅनेलमध्ये झालेली फाटाफूट, उमेदवारी देताना करण्यात आलेल्या खेळ्या, बिनविरोध निवडणुकीत आणलेला अडथळा आणि सर्वांत महत्त्वाचे म्‍हणजे झालेले आरोप-प्रत्यारोप यामुळे संपूर्ण जिल्‍हा परिषदेचे वातावरण ढवळून निघाले. ही निवडणूक दोन्‍ही पॅनेलनी प्रतिष्‍ठेची बनवत तालुक्यातूनही प्रचाराचा धुरळा उडवला. महावीर सोळांकुरे, चेअरमन राजीव परीट, एम. आर. पाटील हे सत्ताधारी पॅनेलचे नेतृत्‍व, तर सचिन जाधव, ए. व्‍ही. कांबळे, एस. ए. गायकवाड हे विरोधी पॅनेलचे नेतृत्‍व करीत आहेत. बहुतांश कर्मचारी हे प्रचारात सक्रिय असल्याने जिल्‍हा परिषदेतही शुकशुकाट पाहायला मिळत आहे.

गडहिंग्‍लज शाखेतील ३५ लाखांचा अपहार, ३० लाखांचे ॲप यावरून विरोधी गटाने सत्ताधाऱ्यां‍ना घेरले आहे; तर सहकार खात्यानेच अशा प्रकारचा अपहार झाला नसल्याचे सांगून ‘क्‍लीन चीट’ दिल्याचा दावा सत्ताधाऱ्यां‍नी केला. तसेच, या अहवालास विरोधकांनी सहकार आयुक्‍तांकडे दाद का मागितली नाही, अशी विचारणा करीत विरोधकांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्‍न केला. कधी नव्‍हे ते तालुक्यातील यंत्रणा व मोठ्या प्रमाणात महिला कर्मचारीही या निवडणुकीत सक्रिय असल्याचे पाहायला मिळाले. रविवारी (ता. १५) मतदानासाठीही अशीच चुरस दिसून येणार आहे.
....
तालुकानिहाय मतदार संख्या

जिल्‍हा परिषद मुख्यालय ३४८
करवीर पंचायत समिती ३६३
पन्‍हाळा ३६२
कागल १७२
गगनबावडा ९३
गडहिंग्‍लज १२२
आजरा ९२
चंदगड ९३
हातकणंगले १९७
शिरोळ १०६
राधानगरी २२१
भुदरगड १४१
शाहूवाडी २१६
...................................
एकूण २५२६