जिल्ह्यातील उपसरपंच निवडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्ह्यातील उपसरपंच निवडी
जिल्ह्यातील उपसरपंच निवडी

जिल्ह्यातील उपसरपंच निवडी

sakal_logo
By

01366
सुजाता शेळके

शेळकेवाडीच्या उपसरपंच सुजाता शेळके
सोनाळी : शेळकेवाडी (ता. करवीर) ग्रामपंचायत उपसरपंचपदी सुजाता सागर शेळके यांची बिनविरोध निवड झाली. उपसरपंचपदाच्या निवडीसाठी विरोधी गटाकडून उपसरपंच पदासाठी अर्ज न आल्याने उपसरपंचपदी शेळके यांची बिनविरोध निवड झाली. अध्यासी अधिकारी सरपंच तेजश्री शेळके, स्थापत्य अभियंता बाबासो कोळी व ग्रामविकास अधिकारी सुरेखा आव्हाड यांच्या उपस्थितीत ही निवड झाली. या वेळी माजी सरपंच जे. के. शेळके, किरण शेळके, रणजित शेळके, दत्तात्रय शेळके, महादेव शेळके, दिलीप शेळके, ग्रामपंचायत सदस्य दीपक शेळके, रूपाली शेळके, जयवंत शेळके आदी उपस्थित होते.
----------------
००८४३
मारुती तामकर

मारुती तामकर धामोडचे उपसरपंच
धामोड : येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी मारुती भाऊ तामकर यांची बिनविरोध निवड झाली. अध्यक्षस्थानी सरपंच रेश्मा नवणे होत्या. उपसरपंचपदाचे नाव एन. जी. नलवडे यांनी सुचविले. निवड प्रक्रियेचे वाचन ग्रामविकास अधिकारी संतोष गुरव यांनी केले. निवडीवेळी विलास कदम, विश्‍वास गुरव, विलास पाटील, सुभाष कदम, श्रीमाबाई चौगले, विमल बोडके, स्नेहा नलवडे, नेत्रांजली कोरे, सुवर्णा पाटील, रोहिणी तेली, कविता कांबळे आदी उपस्थित होते. विश्‍वास गुरव यांनी आभार मानले.
-----------
01488
सहदेव कर्नाळे

कोतोलीच्या उपसरपंचपदी कर्नाळे
तुरुकवाडी : कोतोली-वारणा (ता. शाहूवाडी) येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सहदेव नारायण कर्नाळे यांची बिनविरोध निवड झाली. सरपंचपदासह दहा सदस्य संख्या असणाऱ्या ग्रामपंचायतीवर शिवसेना राष्ट्रवादी युतीची सत्ता आहे. उपसरपंचपदासाठी सहदेव कर्नाळे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडणूक अधिकारी कांबळे यांनी कर्नाळे यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. या वेळी सरपंच दिलीप पाटील, भीमराव पाटील, पांडुरंग आचरे, संपत पाटील, आनंदराव पाटील उपस्थित होते.
----------------
03549
बाबासाहेब गावडे

कुंभारवाडी उपसरपंचपदी बाबासाहेब गावडे
पुनाळ : कुंभारवाडी (ता. पन्हाळा) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी बाबासाहेब पांडुरंग गावडे यांची निवड झाली. अध्यक्षस्थानी सरपंच संपदा नीलेश वरुटे होत्या. या वेळी अमृता पोटळे, शहाजी नायकवडे, स्नेहल कर्ले, अजित पाटील, सुरेखा शिंदे, सविता कुंभार, ग्रामसेविका मनीषा जाधव, शिंगे, शिवाजी नायकवडे, अश्‍विन वरुटे, प्रकाश कुंभार, शरद कुंभार उपस्थित होते.
--------------
01364
सचिन कोंडेकर

नंदवाळ उपसरपंचपदी कोंडेकर
सोनाळी : नंदवाळ (ता. करवीर) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सचिन शामराव कोंडेकर यांची बिनविरोध निवड झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच अमर कुंभार होते.
उपसरपंचपदासाठी विरोधी शिवसेना गटाकडून अर्ज न आल्याने काँग्रेसच्या कोंडेकर यांची बिनविरोध निवड झाली. शाखा अभियंता आर. बी. पाटील व ग्रामविकास अधिकारी उत्तम पाटील यांच्या उपस्थितीत ही निवड झाली. या वेळी यशवंत सावर्डे, चंद्रकांत वाघवे, सुभाष पाटील, विनायक शिंदे, भिकाजी कांबळे, ग्रामपंचायत सदस्य सुरेश उलपे, तानाजी कांबळे, सविता निकम, उज्ज्वला गुरव उपस्थित होते.
----------------------
01156
अश्लेश खाडे

भुयेच्या उपसरपंचपदी अश्लेश खाडे
भुये : येथील ग्रामपंयायतीच्या उपसरपंचपदी अश्लेश अजित खाडे यांची बिनविरोध करण्यात आली. निवड सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच मालिनी पाटील-भुयेकर होत्या. या वेळी हनुमान ग्रामविकास आघाडीचे प्रमुख भारत पाटील-भुयेकर, प्रदीप पाटील-भुयेकर, विक्रम पाटील, ग्रामपंचायत सदस्य कुलदीप पाटील, साक्षी पाटील, मेघा शिंदे, संगीता पाटील, शामराव पाटील, बाबासाहेब कटमाळे, शंकर पाटील उपस्थित होते. ग्रामसेवक अवधूत पाटील यांनी आभार मानले.
--------------------
01353
दीपमाला पाटील
हिरवडे खालसा उपसरपंचपदी दीपमाला पाटील
सोनाळी : हिरवडे खालसा (ता. करवीर) येथील ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी दीपमाला मारुती पाटील यांची बिनविरोध निवड झाली. निवड सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच नदीम अल्ताफ मुजावर होते. या वेळी सदस्य युवराज पाटील, भगवान आतिगे, बाजीराव पाटील, रंगराव काशीद, बबन पाटील, बी. एल. पाटील, संग्राम अतिग्रे, बाबासो शिंदे, कृष्णात पाटील, लियाकत मुजावर, गणपती पाटील उपस्थित होते. ग्रामसेवक एम. व्ही. पाटील यांनी आभार मानले.