तनिष्का जिजाऊ जयंती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तनिष्का जिजाऊ जयंती
तनिष्का जिजाऊ जयंती

तनिष्का जिजाऊ जयंती

sakal_logo
By

लोगो-
तनिष्का

दोन कॉलम
75500
कोल्हापूर : ‘सकाळ-तनिष्का’ व्यासपीठातर्फे जिजाऊ जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांसह सहभागी तनिष्का सदस्या.


सीमा कोडापे यांची
वक्तृत्व स्पर्धेत बाजी
---
जिजाऊ जयंतीनिमित्त आयोजन
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १४ : ‘सकाळ-तनिष्का’ व्यासपीठातर्फे राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त महिलांसाठी वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन केले होते. या स्पर्धेत सीमा कोडापे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. शुभदा कामत यांनी द्वितीय, तर श्रेया चौगुले यांनी उत्तेजनार्थ क्रमांक मिळविला.
‘सकाळ-तनिष्का’तर्फे राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या वक्तृत्व स्पर्धेत महिलांनी मोठा प्रतिसाद दिला. आजची व उद्याची जिजाऊ, मी जिजाऊ व आदर्श माता हे स्पर्धेचे विषय होते. सहभागी झालेल्या महिलांनी जिजाऊंच्या कार्यकर्तृत्वावर अभ्यासपूर्ण विवेचन केले. आपल्या वाणीतून जिजाऊंनी केलेले छत्रपती शिवाजी महाराजांवरील संस्कारांचे मोल सांगत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. या निमित्ताने जिजाऊंच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू उलगडले. जिजाऊंनी दिलेल्या संस्कारांमुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी वर्षानुवर्षे चालणारी गुलामगिरी मोडून काढली. स्वराज्य निर्माण करण्याचा प्रचंड आत्मविश्‍वास शिवरायांमध्ये निर्माण झाला, तो जिजाऊंच्या संस्कारांमुळे, अशी भावना या वेळी तनिष्का सदस्यांनी व्यक्त केली. तनिष्का व्यासपीठाचे समन्वयक राजेंद्र जाधव व गटप्रमुख मंगला काळे यांनी संयोजन केले.