कर्करोग प्रतीबंधक लसीकरण शासनस्तरावर व्हावे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कर्करोग प्रतीबंधक लसीकरण शासनस्तरावर व्हावे
कर्करोग प्रतीबंधक लसीकरण शासनस्तरावर व्हावे

कर्करोग प्रतीबंधक लसीकरण शासनस्तरावर व्हावे

sakal_logo
By

कर्करोग प्रतीबंधक लसीकरण व्हावे
डॉ. राधिका जोशी; शासनस्तरावर पुढाकार हवा, गैरसमजातून रोग बळावण्याचा धोको
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १४ : महिलामध्ये गर्भाशय व स्तनांच्या कर्करोगाचे प्रमाण वाढते आहे. अनेकदा गैरसमजातून त्याकडे दुर्लक्ष होते यातून कर्करोगाची बळावण्याची शक्यता वाढते त्याला आवर घालण्यासाठी कर्करोग प्रतीबंधक लसी उपलब्ध होत आहेत. त्याचा शासनस्तरावरून लसीकरण, व्हावे तसेच लक्षणे दिसताच महिलांनी वेळीच तपासणी करून घेत कर्करोग असल्यास उपचारातून बरे व्हावे यासाठी नव्याने जागृती हाती घेतली आहे, अशी माहिती स्त्री रोग तज्ञ डॉ. राधिका जोशी यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.
प्रसुती रोग तज्ञांची वैद्यकीय परिषदेस आज सुरवात झाली. यात महिलांना होणाऱ्या गर्भाशय व स्तनांच्या कर्करोगावर वेळीच नियंत्रण मिळवणे आवश्यक आहे. त्यासाठी जागृती करण्यासाठी डॉ. जोशी यांनी एक लाख रूपयांचा निधी संघटनेकडे दिला. तसेच त्यांनी महिलांच्या कर्करोगाचे गांभिर्य या परिषदेत मांडले.
डॉ. जोशी म्हणाल्या, ‘‘गर्भाशयाचा कर्करोग असल्याचे सहजपणे वरून जाणवत नाही, एखाद्या महिलेच्या आरोग्य लक्षणात बदल झाले. अधू-मधून केव्हाही रक्तस्त्राव होऊ लागला. तसेच काही महिलांच्या स्‍तनात गाठ तयार झाली असेल, अशी लक्षणे दिसतात. मात्र अनेक महिला कर्करोगाच्या भितीने तपासणी करीत नाहीत. काही महिला त्याकडे दुर्लक्ष करीत राहतात. असे दुर्लक्ष गंभीर ठरू शकतो. विशेषतः ३० वर्षावरील महिलांमध्ये अशी लक्षणेही दिसतात व त्यांनी तपासणीच टाळल्याचे दिसते. इमिनिओ थेरपि, रेडीयशन थेरपि किंवा शस्त्रक्रिया व औषधोपचारातून कर्करोगावर मात करता येते. या विषयी महिलांमध्ये संघटनात्मक पातळीवर जागृती केली जाणार आहे.’’
----------------
चौकट
कॅन्सर सोसायटीने पाठपुरावा करावा
ज्या विषाणूपासून गंर्भाशय किंवा स्तनाचा कर्करोग होऊ शकतो त्याला प्रतिबंध करणारी लस आली आहे. भारतातील कंपन्याच्या लसही लवकर उपलब्ध होतील अशा लस ९ ते १५ वयोगटातील मुलींना द्याव्या लागतील त्यातून भविष्यातील कर्करोगाचे प्रमाण नियंत्रणात ठेवता येईल, त्यासाठी शासनाने अशा लस द्याव्यात यासाठी इंडीयन कॅन्सर सोसायटीने शासनाकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी ही डॉ. जोशी यांनी केली आहे.