आजरा ः टस्कर मस्त , शेतकरी त्रस्त मालीका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजरा ः टस्कर मस्त , शेतकरी त्रस्त मालीका
आजरा ः टस्कर मस्त , शेतकरी त्रस्त मालीका

आजरा ः टस्कर मस्त , शेतकरी त्रस्त मालीका

sakal_logo
By

‘टस्कर मस्त, शेतकरी त्रस्त’ ... १ मालिका लोगो
.....
75521 आजरा ः तालुक्यात वावरणारा टस्कर .. संग्रहित
-----------------------

हत्तींच्या आगमनाचे उलटले तप

आजरा, चंदगड तालुक्यात नुकसानीने शेतकरी त्रस्त
.....

लीड

आजरा व चंदगड तालुक्यात हत्तीकडून होणारे पिकाचे नुकसान हे शेतकऱ्यांना एकप्रकारे अंगवळणीच पडले आहे. दररोज शेतात टस्कर उतरून पीक फस्त करतो. शेती अवजारे, पाण्याच्या टाक्यांची मोडतोड करतो, हे या तालुक्यातील नेहमीचे चित्र आहे. शेतकऱ्यांकडून याबाबत शासनदरबारी आवाज उठवला जात असला तरी त्यावर ठोस उपाययोजना शासन, वनविभागाकडून होताना दिसत नाहीत. नुकसानभरपाईबाबत मात्र पंचनाम्याचे कागदी घोडे नाचवले जात आहेत. हत्ती कर्नाटकातून येवून स्थिरावले असून एक तपही उलटले आहे. एकूणच हत्तींमुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान आणि शासकीय यंत्रणांची उदासीनता याबाबतची मालिका आजपासून...
...............

रणजित कालेकर, सकाळ वृत्तसेवा

आजरा, ता. १४ ः जंगलाने वेढलेल्या व दुर्गम, डोंगराळ भाग असलेल्या आजरा तालुक्यात वन्यप्राण्यांचा उपद्रव तसा नवा नाही. रानडुक्कर, गवे, वनगाई, माकड, साळिंद्र, मोर, लांडोर, सांबर यांच्याकडून पिकांची नुकसान सुरूच आहे, पण गेल्या काही वर्षांत कर्नाटकातून हत्तींचे आगमन झाल्यावर पिकांचे नुकसान वाढले. नुकसानीचे आकडे कोटीला भिडू लागले. आधीच अस्मानी संकटाने त्रस्त असलेला शेतकरी हत्तींच्या उपद्रवाने मेटाकुटीला आला आहे.
चंदगड तालुक्यात २००४ मध्ये कर्नाटकमधून हत्तींचा कळप आला. मात्र आजरा तालुक्यात हत्तीचे आगमन मात्र दोन वर्षे वेळाने झाले. १० जून २००६ मध्ये तालुक्यात हत्तीचे आगमन झाले. चंदगड तालुक्याची सीमा ओलांडून टस्कर एरंडोळ या गावात आला. येथे एक दिवस मुक्काम केल्यानंतर तो हिरण्यकेशी नदी ओलांडून पेरणोली येथे आला. येथील नावलकरवाडीमध्ये शेतात वस्तीला असलेल्या संताजी सोले यांची खोप त्याने मोडली. त्यानंतर तो भुदरगडमार्गे राधानगरीला गेला. येथील हसणे धनगरवाड्यावर त्याचा दुर्देवी अंत झाला. त्यानंतर मात्र हत्तीचे कळप तालुक्यात येत राहिले; पण त्याचवेळी तालुक्यात आलेला टस्कर मात्र परतला नाही.
चित्री, धनगरमोळा, खानापूर, घाटकरवाडी पाटबंधारे प्रकल्पामुळे त्याला डुंबण्यासाठी मुबलक पाणी मिळाले. त्याचबरोबर ऊस, बांबू यामुळे मुबलक खाद्याची सोय झाली. त्यामुळे टस्कराने मसोलीजवळील चाळोबा जंगलात ठाण मांडले आहे. २००८ पासून राहुटी टाकून असलेला टस्कर आजऱ्याचाच रहिवाशी होवून गेला आहे. त्याचबरोबर येथे जन्मलेले पिल्लूही या जंगलाचा भाग बनून राहीले आहे. त्या दोघांच्याकडून पिकांचे मोठे नुकसान होत असून, त्यांचा वाढता उपद्रव शेतकऱ्यांची डोकेदुखी बनला आहे. वनविभागाकडून नुकसानीचे पंचनामे केले जात आहेत. पीक नुकसानीचे आकडे कोटीला भिडले आहेत, पण ठोस उपाययोजनांबाबत अद्यापही पावले उचलली गेलेली नाहीत. शेतकरी नुकसानीची कागदपत्रे घेवून या कार्यालयातून त्या कार्यालयाचे उंबरठे झिजवताना दिसत आहे.
.....

चाळोबा गणेश आणि अण्णा

येथील चाळोबाच्या जंगलात जन्मलेला टस्कर ‘चाळोबा गणेश’ नावाने ओळखला जातो. सध्या पेद्रेवाडी परिसरात त्याचा उपद्रव सुरू आहे. कर्नाटकातून आलेला टस्कर ‘अण्णा’ नावाने परिचित आहे. सध्या तो चंदगड परिसरात आहे. दोघांनी तालुक्यात ठाण मांडले आहे.