Wed, Feb 8, 2023

निवृत्त पोलिस अधिकाऱ्याला धमकी
निवृत्त पोलिस अधिकाऱ्याला धमकी
Published on : 15 January 2023, 5:02 am
निवृत्त पोलिस अधिकाऱ्याला
धमकी, एकावर गुन्हा दाखल
कोल्हापूर ः निवृत्त सहायक पोलिस आयुक्त सुनील पुंडलिक कलगुटकर (रा. स्माईल स्टोन अपार्टमेंट, रमण मळा) यांना धमकावल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला. राजेश सुधाकर डाके (रा. स्माईल स्टोन अपार्टमेंट, रमण मळा) याच्यावर याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कलगुटकर हे पोलिस मुख्यालय ते पितळी गणपती या रस्त्यावरून निघाले होते. या वेळी त्यांना राजेश डाके याने धमकावले. २२ डिसेंबर २०२२ ला ही घटना घडली. याबाबतची फिर्याद त्यांनी पोलिस ठाण्यात दिली. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.