भटक्या कुत्र्यांसाठी रोटरी सनराईजचा प्रकल्प | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भटक्या कुत्र्यांसाठी रोटरी सनराईजचा प्रकल्प
भटक्या कुत्र्यांसाठी रोटरी सनराईजचा प्रकल्प

भटक्या कुत्र्यांसाठी रोटरी सनराईजचा प्रकल्प

sakal_logo
By

‘रोटरी सनराईज’तर्फे गुरुवारी
श्‍वान शाळा प्रकल्पाचे उद्‌घाटन
कणेरी मठात कार्यक्रम; अन्य प्रकल्पांचाही उभारणी
कोल्हापूर, ता. १६ : रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराईजतर्फे कणेरी मठ येथे भटक्या कुत्र्यांचा ‘श्‍वान शाळा’ प्रकल्प, सिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये न्यूरो मॉनिटरिंग मशीन, मॅमोग्राफी युनिट, तीन ठिकाणी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभा केला आहे. या सर्व प्रकल्पांचे उद्‌घाटन गुरुवारी (ता. १९) सकाळी १० वाजता अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी यांच्या हस्ते होईल,’’ अशी माहिती सचिन मालू यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मालू म्हणाले, ‘‘रोटरी सनराईज, चंद्रकांत हंजरीमल राठोड परिवार, कणेरी मठातर्फे महाराष्ट्रातील पहिली भटक्या कुत्र्यांसाठी श्‍वान शाळा प्रकल्प उभारला आहे. ४०० भटक्या कुत्र्यांना इथे आश्रय देण्यात येईल. सिद्धगिरी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरकरिता मेंदूवरील जटिल शस्त्रक्रिया करण्यासाठी ‘न्यूरो मॉनिटरिंग मशीन’ हे दि. रोटरी फाउंडेशन, मादागास्कर रोटरी क्लब, रोटरी सनराइज कोल्हापूरतर्फे आर्थिक सहकार्यातून देण्यात येणार आहे. कर्करोग तपासणीसाठी ‘मॅमोग्राफी युनिट’ही प्रदान केले जाईल.’’
रोटरी सनराईज संस्थेची कसबा बावडा येथे स्वतंत्र इमारत आहे. या ठिकाणी संस्थेच्या २५ व्या वर्षपूर्तीनिमित पाच इंटरनॅशनल ग्लोबल ग्रँट प्रकल्प, सीएसआर फंडिंगतर्फे काही मोठे प्रकल्प क्लबच्या संकल्पनेतून पुढे आले असून ते १८ रोजी पूर्ण होत आहे. या प्रकल्पांच्या पायाभरणीचे उद्‌घाटन केले जाईल. या कार्यक्रमास गौरीश धोंड, प्रांतपाल व्यंकटेश देशपांडे, भावी प्रांतपाल नासिर बोरसदवाला, शरद पै, अरुण भंडारे, करुणाकर नायक, विद्यमान सहायक प्रांतपाल सुभाष कुत्ते, डिस्ट्रिक्ट ऑफिसर अजय मेनन आदी उपस्थित राहतील.
पत्रकार परिषदेला दिव्यराज वसा, विक्रांतसिह कदम, प्रसन्न देशिंगकर, राहुल आर. कुलकर्णी, अध्यक्ष ऋषिकेश खोत, सचिव राहुल एस. कुलकर्णी उपस्थित होते.