चाळोबा ओढा-दुगूनवाडी रस्त्याचे दुखणे कायम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चाळोबा ओढा-दुगूनवाडी रस्त्याचे दुखणे कायम
चाळोबा ओढा-दुगूनवाडी रस्त्याचे दुखणे कायम

चाळोबा ओढा-दुगूनवाडी रस्त्याचे दुखणे कायम

sakal_logo
By

GAD177.JPG

मासेवाडी : चाळोबा ओढा ते दुगूनवाडीदरम्यानचा रस्ता असा उखडला गेला आहे.
------------------------------------------------------
चाळोबा ओढा-दुगूनवाडी
रस्त्याचे दुखणे कायम
सकाळ वृत्तसेवा
दुगूनवाडी, ता. १७ : मासेवाडीच्या चाळोबा ओढ्यापासून ते दुगूनवाडीपर्यंतच्या अवघ्या तीन ते चार किलोमीटर रस्त्याचे दहा वर्षांपासूनचे दुखणे आजही कायम आहे. हा रस्ता खडीकरण व डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे प्रवाशांतून संताप व्यक्त होत आहे.
मासेवाडीच्या पश्‍चिमेला व दुगूनवाडी बाजूकडील कुलकर्णी ओढ्यानजीक ते पुढे ठिकठिकाणी रस्त्याची पूर्ण दुरवस्था झाली आहे. रस्ता जागोजागी उखडून खडी बाहेर आली आहे. खडीतून वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन वाहने चालवावी लागत आहेत. बऱ्‍याच ठिकाणी रस्ता खचून गेला आहे. रस्त्यावरून चालणेही मुश्किल झाले आहे. येथे वाहनांची वर्दळ जास्त असल्याने प्रसंगी छोट्या-मोठ्या अपघातांचा सामना वाहनधारकांना करावा लागत आहे. काही ओढ्यांवरील मोरींची पडझड होऊन धोका निर्माण झाला आहे. एप्रिल-मे महिन्यामध्ये या भागातील काही गावांच्या महालक्ष्मीच्या यात्रा आहेत. या पार्श्वभूमीवर हा रस्ता सुरक्षित असणे महत्त्वाचे आहे. जिल्हा परिषद बांधकाम विभागाने व लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन मुख्यमंत्री सडकसारख्या मोठ्या योजनेत या संपूर्ण महागाव ते दुगूनवाडी रस्त्याच्या मजबुतीकरणाचे काम हाती घेण्याची गरज आहे. असे प्रयत्न झाले तरच या रस्त्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटणे शक्य आहे, अशी मागणी वाहनधारकांतून होत आहे.
-------------
जिल्हा परिषद बांधकाम विभागातील अधिकाऱ्‍यांनी कोणता रस्ता वाहतुकीसाठी महत्त्वाचा आहे, हे तपासून रस्त्यांच्या कामांना मंजुरी देणे आवश्यक आहे. हा रस्ता दहा वर्षे प्रलंबित आहे. असा रस्ता मुख्यमंत्री सडक योजनेतून करणे गरजेचे आहे.
- रोहिदास चौगुले, माजी सरपंच, दुगूनवाडी.