शिवाजी विद्यापीठात मराठी भाषासंवर्धन पंधरवडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवाजी विद्यापीठात मराठी भाषासंवर्धन पंधरवडा
शिवाजी विद्यापीठात मराठी भाषासंवर्धन पंधरवडा

शिवाजी विद्यापीठात मराठी भाषासंवर्धन पंधरवडा

sakal_logo
By

मराठी भाषासंवर्धन पंधरवडानिमित्त
शिवाजी विद्यापीठात विविध कार्यक्रम

कोल्हापूर, ता. १७ ः शिवाजी विद्यापीठातील मराठी विभागातर्फे विविध कार्यक्रमांनी ता. २८ जानेवारीपर्यंत मराठी भाषासंवर्धन पंधरवडा साजरा होणार आहे. त्यामध्ये लेखक संवाद, ग्रंथचर्चा, व्याख्यानाचा समावेश आहे. लेखक संवाद कार्यक्रम मंगळवारी सुरू झाला. पहिल्या दिवशी साहित्यिक कृष्णात खोत यांनी संवाद साधला. गुरुवारी (ता. १९) किरण गुरव, शुक्रवारी सदानंद कदम संवाद साधतील. सोमवारी (ता. २३) वसंत गायकवाड लिखित ‘तथागत गौतम बुद्ध’ ग्रंथावर चर्चा होईल. त्यामध्ये ज्येष्ठ साहित्यिक राजन गवस, राजकीय विश्लेषक डॉ. प्रकाश पवार विचार मांडतील. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, तर वसंत गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती आहे, अशी माहिती मराठी विभागप्रमुख डॉ. नंदकुमार मोरे यांनी दिली.