युवकांच्यारोजगार, स्वयंरोजगारावर भर द्यावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

युवकांच्यारोजगार, स्वयंरोजगारावर भर द्यावा
युवकांच्यारोजगार, स्वयंरोजगारावर भर द्यावा

युवकांच्यारोजगार, स्वयंरोजगारावर भर द्यावा

sakal_logo
By

दर्जेदार प्रशिक्षण देण्यावर भर द्या
जिल्हाधिकारी रेखावार; कौशल्य, रोजगार समितीची बैठक
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १८ : कौशल्य विकास केंद्रांनी जिल्ह्यातील बेरोजगार युवक-युवतींना किमान कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत दर्जेदार प्रशिक्षण देण्यासह त्यांच्या रोजगार व स्वयंरोजगारनिर्मितीवरही भर द्यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता जिल्हा कार्यकारी समितीच्या बैठकीत ते बोलत होते.
जिल्हाधिकारी रेखावार म्हणाले, ‘‘कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत देण्यात येणाऱ्या प्रशिक्षणादरम्यान शासकीय योजनांचा लाभ घेतलेले लाभार्थी, यशस्वी उद्योजकांच्या मुलाखती, तसेच प्रोत्साहनपर व्याख्यानांवरही भर दिला पाहिजे.’’ जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त संजय माळी यांनी प्रमोद महाजन कौशल्य विकास व उद्योजकता अभियानांतर्गत आयोजित कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील अधिकाधिक इच्छुक युवक-युवतींनी ३१ जानेवारीपर्यंत गुगल फॉर्मद्वारे ऑनलाईन नोंदणी करावी. हे प्रशिक्षण नि:शुल्क असून, हे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना सरकारमान्य प्रमाणपत्र दिले जाते. प्रशिक्षणाच्या माध्यमातून रोजगार स्वयंरोजगारच्या संधी उमेदवारांना उपलब्ध होतील. जिल्ह्यातील १८ ते ४५ वयोगटातील उमेदवारांनी कावळा नाका, विचारे माळ येथील जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राशी संर्पक साधण्याचे आवाहन केले आहे. या वेळी जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक गणेश गोडसे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे, कौशल्य विकास मार्गदर्शन अधिकारी संगीता खंदारे उपस्थित होते.