म्हैस खरेदीसाठी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

म्हैस खरेदीसाठी
म्हैस खरेदीसाठी

म्हैस खरेदीसाठी

sakal_logo
By

गोकुळ देणार २४३० म्हैशींना अनुदान
पाच हजारांचा पहिला हप्ता अदा; तीस हजार रुपयांपर्यंत मिळणार रक्कम

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १८ : जिल्ह्यात पशुधन वाढावे, तरुण शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसायला चालना मिळावी यासाठी कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक (गोकुळ) ने जातीवंत म्हैस खरेदीसाठी तीस टक्के अनुदान दिले आहे. यामध्ये गोकुळने २४३० म्हैस खरेदी करुन दिली आहे. या म्हैशींसाठी ३० टक्के अनुदान दिले जाणार आहे. सध्या प्रत्येक म्हैशीसाठी पाच हजार रुपये दिले आहेत. त्यानंतर उर्वरित पंचवीस हजार रुपये दिले जाणार आहेत.
तरुण दूध उत्पादकांना पाठबळ देण्यासाठी ‘गोकुळ’ने घेतलेला निर्णय निश्‍चितपणे स्वागर्ताह आहे. ‘गोकुळ’च्या माध्यमातून जिल्ह्यातील १ एप्रिल २०२१ ते ३१ मार्च २०२२ दरम्यान १३२९ व १ एप्रिल २०२२ ते ३१ डिसेंबर २०२२ दरम्यान ११०९ अशा एकूण २४३० म्हैशी घेतल्या आहेत. यामध्ये सुरुवातील वाहतूक खर्च म्हणून पाच हजार रुपये दिले आहेत. त्यानंतर त्यांचे संगोपन झाल्यानंतर उर्वरित २५ हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे. एका म्हैशी मागे तीस टक्के अनुदान दिले जात असल्याने शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होत आहे.
दरम्यान, जिल्हा बँकेनेही गोकुळच्या माध्यमातून म्हैस घेणाऱ्या दुधउत्पादकांसाठी पाचशे कोटी रुपयांपर्यंतच्या कर्ज देण्याचे नियोजन केले आहे. अजूनही ‘गोकुळ’कडून अनुदान देण्याची प्रक्रिया केली जात आहे. ‘गोकुळ’ने दूध संकलनासाठी वीस लाख लिटरचे उद्दिष्टे घेतले आहे. त्यादृ्ष्टीने हे प्रयत्न सुरू आहेत. याशिवाय नवोदित दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसाय करण्यसाठीही याचा फायदा होत आहे.
......
चौकट
१ एप्रिल ते ३१ डिसेंबर २०२२ अखेर
जातीवंत म्हैशीची तालुका निहाय खरेदी

तालुका* म्हैस संख्या
करवीर*२९१
राधानगरी*१०४
पन्हाळा/गगनबावडा* ५५
शिरोळ*२०७
कागल*१२६
शाहूवाडी*४३
हातकणंगले*७३
चंदगड*५५
भुदरगड*६१
गडहिंग्लज*४९
आजरा* ३४
म्हैस एकूण* १०९८