
आजरा ः उमेश आपटेंचा राजीनामा
ajr१८४.jpg..... उमेश आपटे
जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष
उमेश आपटेंचा कॉंग्रेसला रामराम
आजरा, ता. १८ ः जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष उमेश पाटील यांनी राष्ट्रीय कॉंग्रेसला रामराम ठोकला आहे. त्यांनी पक्षाच्या सदस्यपदासह सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांना राजीनामा पत्र पाठविले आहे. कौटुंबिक अडचणीमुळे पक्षाचे काम करू शकत नसल्याचे त्यांनी राजीनामा पत्रात नमुद केले आहे. याची माहीती आपटे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
वडील (कै) मुकुंदराव आपटे सन १९६५ पासून कॉंग्रेसमध्ये सक्रिय कार्यकर्ते होते. त्यांनी उतुरच्या सरपंचपदासह जिल्हा परिषदेमध्ये १४ वर्ष पक्षाचे प्रतिनिधीत्व केले. गेली २७ वर्ष पक्षात कार्यरत असून, दहा वर्ष पंचायत समिती सदस्य, दहा वर्ष जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केले आहे. पत्नी सौ वैशाली आपटे यांनी गत पाच वर्षे पक्षाच्या माध्यमातून उतुरचे सरपंचपद भुषविले. या काळात सातत्याने पक्ष वाढीसाठी काम केले आहे. उतुर जिल्हा परिषदेतील २२ गावात कॉंग्रेस पोहचविण्याचे काम कार्यकर्त्यांच्या माध्यमातून केले आहे. या पक्षाने भरपूर काही दिले. मोठी पद दिली आहेत. आता पक्षात काम करताना अनेक समस्या येत असून, कौटुंबिक अडचणीमुळे पक्षाचे काम पूर्णवेळ करू शकत नाही. तरी राजीनामा मंजूर करावा असे पत्रात नमुद केले आहे. यावेळी त्यांनी कोणत्याही पक्षात जाणार नसुन समाजासाठी काम करणार असल्याचे स्पष्ट केले. जिल्हाध्यक्ष व आमदार सतेज पाटील यांच्या जवळचे कार्यकर्ते असलेल्या आपटे यांनी राजीनामास्त्र काढल्यामुळे अनेकजण अचंबित झाले आहेत.