Mon, Jan 30, 2023

शिंदे विद्यामंदिरात ‘जीवन कौशल्य’वर मार्गदर्शन
शिंदे विद्यामंदिरात ‘जीवन कौशल्य’वर मार्गदर्शन
Published on : 22 January 2023, 4:16 am
76567
शिंदे विद्यामंदिरात ‘जीवन कौशल्य’ कार्यशाळा
कोल्हापूर ः लक्षतीर्थ वसाहत येथील महर्षी वि. रा. ऊर्फ आण्णासो शिंदे विद्यामंदिरात विद्यार्थ्यांना जीवन कौशल्य याविषयावर मार्गदर्शन कार्यशाळा झाली. त्यात कृपाल यादव यांनी मार्गदर्शन केले. ‘इन्स्पायरिंग यंग इंडिया’ या उपक्रमाअंतर्गत आयोजित कार्यशाळेत यादव यांनी विविध कृतीतून विद्यार्थ्यांना जीवन कौशल्याचे धडे दिले. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचे वय हे अत्यंत संस्कारक्षम असते. त्यामुळे मुलांना आयुष्यभर उपयोगी पडतील, अशी जीवन कौशल्ये शालेय वयातच शिकणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. रामचंद्र यादव, विजयकुमार माळी, अमजद मोमीन उपस्थित होते. मुख्याध्यापक दस्तगीर मुल्ला यांनी स्वागत केले.