चित्रपट महामंडळ सुनावणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चित्रपट महामंडळ सुनावणी
चित्रपट महामंडळ सुनावणी

चित्रपट महामंडळ सुनावणी

sakal_logo
By

चित्रपट महामंडळाची
सुनावणी १२ फेब्रुवारीनंतर

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १८ : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या मतदार यादीतून अनेक सभासदांची नावे वगळल्याबद्दल अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्यासह सभासदांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याबाबतची पुढील सुनावणी १२ फेब्रुवारीनंतर घेतली जाणार आहे, अशी माहिती ॲड. युवराज नरवणकर, राजेभोसले यांनी दिली.
सभासदांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होती. तोपर्यंत न्यायालयाच्या आदेशानुसार महामंडळाची निवडणूक प्रक्रियाही स्थगित ठेवण्यात आली आहे. आजच्या सुनावणीवेळी माजी उपाध्यक्ष मिलिंद अष्टेकर यांच्यासह काही सभासदांनी हस्तक्षेप याचिका दाखल केली. निवडणुकीला स्थगिती न देता या याचिकेवर लवकर सुनावणी व्हावी, अशी विनंती त्यांच्यातर्फे केली. मात्र, त्याला न्यायालयाने नकार देऊन पुढील सुनावणी १२ फेब्रुवारीनंतर घेतली जाणार असल्याचे सांगितले. दरम्यान, न्यायालयाच्या या आदेशामुळे महामंडळाची निवडणूक प्रक्रिया पुन्हा लांबणीवर पडली आहे.