
ज्योतिरादित्य सिंधीया बातमी
विमानतळ विस्तारीकरणाचे लवकरच
उद्घाटन : केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे
कोल्हापूर, ता. १९ ः येथील विमानतळाची कनेक्टिव्हिटी वाढवण्याचा माझा संकल्प होता. त्याप्रमाणे आम्ही बंगळूर, मुंबई, अहमदाबाद, तिरुपती यासह देशातील विविध शहरांत कोल्हापूरहून विमानसेवा सुरू केली आहे. लवकरच विमानतळाच्या विस्तारीकरणाच्या कामाचे उद्घाटन होईल, असा विश्वास केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी व्यक्त केला. आज ते दोन दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. त्यावेळी त्यांनी विमानतळावर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
मंत्री शिंदे म्हणाले, ‘हातकणंगले आणि कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये पक्षीय कामासाठी मी कोल्हापुरात आलो आहे. जिल्ह्यात भाजपचे जनमत वाढत आहे. नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत पक्षाला चांगले यश मिळाले. ज्योतिरादित्य शिंदे यांच्या स्वागताला माजी आमदार अमल महाडिक, जिल्हाध्यक्ष समरजितसिंहराजे घाटगे, राहुल चिकोडे, अशोक माने यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.