
सेंद्रीय पद्धतीने शेतीमाल उत्पादन काळाची गरज
ajr191.jpg.....
76724
मसोली (ता. आजरा) ः येथील शेतीशाळेत मार्गदर्शन करताना विभागीय नोडल अधिकारी (स्मार्ट प्रकल्प) उमेश पाटील. या वेळी उपस्थित मान्यवर.
------------------
सेंद्रिय पद्धतीने शेतीमाल उत्पादन काळाची गरज
---
उमेश पाटील; मसोली येथे स्मार्ट अंतर्गत शेतीशाळा
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. १९ ः बाजारपेठेचा विचार करून शेतकऱ्यांनी उत्पादन घ्यावे. दर्जेदार व सात्विक शेतीमाल उत्पादित करावा. जे खपते तेच पिकवावे. सध्याच्या जगात सेंद्रिय उत्पादनाची मागणी मोठी आहे. केंद्र सरकारही यासाठी धोरण घेत आहे, असे प्रतिपादन विभागीय नोडल अधिकारी (स्मार्ट प्रकल्प) उमेश पाटील यांनी केले.
मसोली (ता. आजरा) येथे बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) अंतर्गत शेतीशाळा शेतीदिन झाला. या वेळी त्यांनी मार्गदर्शन केले. आजरा तालुका शेतकरी विकास मंडळ व आजरा अॅग्रो प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष संभाजी सावंत अध्यक्षस्थानी होते. नोडल अधिकारी स्मार्ट कोल्हापूरचे नामदेव परीट, पुरवठा व मूल्य साखळी तज्ज्ञ कोल्हापूरचे राजन कामत, धनंजय वाघ, तालुका कृषी अधिकारी के. एम. मोमीन, मंडल कृषी अधिकारी डॉ. निलकुमार ऐतवडे, मिशन ऑर्गेनिकचे प्रमुख राहुल टोपले प्रमुख उपस्थित होते.
श्री. परीट यांनी स्मार्ट प्रकल्प योजनेची माहिती दिली. तालुका कृषी अधिकारी श्री. मोमीन यांनी भेसळीवर प्रतिबंधात्मक उपाययोजनेची माहिती दिली. श्री. टोपले यांनी विषमुक्त व पारंपरिक शेतीबाबत मार्गदर्शन केले. प्रगतिशील शेतकरी जयसिंग होडगे, सुनीता गुरव यांनी अनुभव कथन केले. श्री. सावंत यांचे भाषण झाले. सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक (आत्मा) अमित यमगेकर, सुरेश गुरव, श्रीकृष्ण ऐनापुरे, घनशाम बिक्कड, स्वप्नील कमते आदी उपस्थित होते. आप्पा पावले यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सी. डी. सरदेसाई यांनी आभार मानले.