त्रिवेणी मैफल रविवारी पुन्हा रंगणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

त्रिवेणी मैफल रविवारी पुन्हा रंगणार
त्रिवेणी मैफल रविवारी पुन्हा रंगणार

त्रिवेणी मैफल रविवारी पुन्हा रंगणार

sakal_logo
By

‘त्रिवेणी’ मैफल
रविवारी पुन्हा रंगणार
कोल्हापूर : पद्मश्री माणिक वर्मा, पंडिता ज्योत्स्ना भोळे, पंडिता मालती पांडे या गायिकांनी गायिलेल्या गाण्यांवर आधारित ‘त्रिवेणी’ ही मैफल नुकतीच रसिकाग्रणी मदनमोहन लोहिया सांस्कृतिक मंचने आयोजित केली होती. लोकआग्रहास्तव ही मैफल आता पुन्हा रविवारी (ता.२२) रंगणार आहे. संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात सायंकाळी चारला ही मैफल होईल. भावगीत, भक्तिगीत, लावणी, चित्रपट गीत, नाट्यगीत, गझल, कोळीगीत अशा विविध गीत प्रकारांनी सजलेली ही मैफल असेल. डॉ. शीतल धर्माधिकारी यांची संकल्पना, तर प्रसाद कुलकर्णी यांचे संयोजन आहे. अधिकाधिक रसिकांना मैफलीचा लाभ घेता यावा, यासाठी नाममात्र प्रवेशिका शुल्क असेल. उद्या (ता. २०) पासून प्रवेशिका नाट्यगृहावर उपलब्ध केल्या आहेत. अधिक माहितीसाठी प्रसाद कुलकर्णी, शिल्पा कुलकर्णी, मिलिंद कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधावा.