
तारदाळ ः पाणी योजना उदघाटन
76871
नल जल योजनेसाठी
६६ हजार कोटींचा निधी
मंत्री शिंदे; तारदाळला सौरउर्जेवरील पाणी योजनेचे उद्घाटन
तारदाळ, ता.19 ः गेल्या 60 वर्षात झाले नाही ते 8 वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. केंद्र शासनाने नल जल योजनेसाठी 66 हजार कोटींची तरतूद केल्याने ग्रामीण भाग पाण्यापासून वंचित राहणार नाही, असे प्रतिपादन केंद्रीय विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी केले.
तारदाळ (ता. हातकणंगले) येथे 52 कोटीच्या सौरउर्जेवर चालणाऱ्या जलजीवन मिशन योजनेच्या कामाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. चौंडेश्वरी गृहनिर्माण संस्थेच्या परिसरात मंत्री शिंदें यांच्याहस्ते भूमिपूजन करून जलजीवन योजनेचा कामाचा प्रारंभ केला. यावेळी खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर यांची उपस्थिती होती.
मंत्री शिंदे म्हणाले, ‘भविष्यात पंतप्रधान मोदी देशातील नद्या प्रदूषणमक्त होण्यासाठी विविध कार्यक्रम राबविणार आहेत.’
जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रसाद खोबरे प्रास्ताविकात म्हणाले, ‘सौरउर्जेवर चालणाऱ्या योजनेमुळे तारदाळ-खातवाडीचा पाण्याचा प्रश्न निकालात निघाला.’
याप्रसंगी आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार अमल महाडिक, हिंदुराव शेळके, रवींद्र माने, तानाजी पोवार, अशोकराव माने, संजय चोपडे, सुनील महाजन, भाजपा तारदाळ अध्यक्ष सतीश नर्मद, अंजना शिंदे, तारदाळ सरपंच सौ. पल्लवी पोवार, उपसरपंच दीपाली कोराणे, खोतवाडी सरपंच विशाल कुंभार, उपसरपंच सौ. शिल्पा पोवार, सचिन पोवार, विनोद कराणे, रणजित पोवार, भीमराव बने, बाबासो महाजन, वैभव पोवार, ग्रामपंचायत सदस्य अकबर करडी, राणी शिंदे, प्रवीण पाटील, मृत्युंजय पाटील, संगिता पाटील, सुरज कोळी, विमल पवार, राणी माने, सुवर्णा दाते, पुनम जाधव, लक्ष्मी चौगुले, नयन कांबळे, नितीन खोचरे, मालुबाई चौगुले, खोतवाडीचे सदस्य गजानन नलगे, शोभा कांबळे उपस्थित होते.
दरम्यान, तिसऱ्या आघाडीचे नेते विजय जाधव यांच्यासह कृष्णा भिसे, अनिकेत साखळकर, राहूल पाटील, सचिन पाटील यांनीही मंत्री शिंदेंच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.