रेल्वेप्रश्नी केंद्रीय मंत्री शिंदे यांना निवेदन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रेल्वेप्रश्नी केंद्रीय मंत्री शिंदे यांना निवेदन
रेल्वेप्रश्नी केंद्रीय मंत्री शिंदे यांना निवेदन

रेल्वेप्रश्नी केंद्रीय मंत्री शिंदे यांना निवेदन

sakal_logo
By

रेल्वेप्रश्नी केंद्रीय मंत्री शिंदे यांना निवेदन
इचलकरंजी : येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये हातकणंगले - इचलकरंजी रेल्वे मार्गासाठी भरीव आर्थिक तरतूद करावी, अशी मागणी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे रेल्वे कृती समितीने केली. हा नियोजीत मार्ग रेल्वेच्या महत्त्वपूर्ण पिंक बुकमध्ये समाविष्ट झालेला आहे. पण दरवर्षी अर्थसंकल्पामध्ये अल्पसा निधी दिला गेला आहे. इचलकरंजी वस्त्रनगरीला रेल्वेमार्ग हा उद्योग वाढीसाठी आणि प्रवासी वाहतुकीसाठी खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे हा रेल्वे मार्ग त्वरित होण्यासाठी येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये भरीव आर्थिक तरतूद करावी, असे निवेदनात नमूद केले आहे. यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी कृती समितीच्या शिष्टमंडळाला दिले. गुरुनाथ महातुकडे, श्रीनिवास शर्मा, बाळकृष्ण तोतला, महेंद्र जाधव, पांडुरंग महातुकडे, ऋषभ जैन, अरविंद शर्मा, दीपक पंडित, सागर रावन उपस्थित होते.