इचलकरंजी मनपा संघ विजेता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इचलकरंजी मनपा संघ विजेता
इचलकरंजी मनपा संघ विजेता

इचलकरंजी मनपा संघ विजेता

sakal_logo
By

ich202.jpg
76948
इचलकरंजी : शालेय शासकीय कबड्डी स्पर्धेतील विजेत्या संघांना बक्षीस देताना अलका शेलार, शेखर शहा आदी.

इचलकरंजी मनपा संघ विजेता
शालेय शासकीय कबड्डी स्पर्धा : मुलींमध्ये सांगली जिल्ह्याची बाजी

इचलकरंजी, ता. २० ः येथे झालेल्या शालेय शासकीय कबड्डी स्पर्धेत इचलकरंजी मनपा मुलांच्या संघाने विजेतेपद पटकावले. जयहिंद मंडळाच्या क्रिडांगणावर ही स्पर्धा झाली. १४ वर्षाखालील गटासाठी ही स्पर्धा झाली.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद (कोल्हापूर) व राजर्षी छत्रपती शाहू हायस्कूल (इचलकरंजी) यांच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेत कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हा यांसह इचलकरंजी, कोल्हापूर, सांगली मनपा संघ सहभागी झाले होते.
अंतिम सामन्यात मुलांमध्ये इचलकरंजी मनपा विरुद्ध सांगली जिल्हा यांच्यामध्ये झाला. या सामन्यात इचलकरंजी मनपाच्या मुलांच्या संघाने सांगली जिल्ह्यातील मुलांच्या संघावर ३४ गुणांनी विजय मिळवला. तर मुलींच्या सामन्यात सांगली जिल्हा विरुद्ध रत्नागिरी जिल्हा यांच्यामध्ये झाला. या सामन्यात सांगली जिल्ह्यातील मुलींच्या संघाने रत्नागिरी जिल्ह्याच्या संघावर ३० गुणांनी विजय मिळवला.
इचलकरंजी महापालिका मुलांच्या संघाची व सांगली जिल्हा मुलीच्या संघाची जळगाव येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. बक्षीस वितरण रवींद्रनाथ टागोर विद्यानिकेतनच्या सौ. अलका शेलार यांच्याहस्ते झाले. इचलकरंजी मनपाचे क्रीडा अधिकारी शंकर पोवार, हातकणंगले तालुका शारीरिक शिक्षण संघटनेचे अध्यक्ष शेखर शहा, विजय गुरव, बाळकृष्ण ढवळे, तुषार जगताप, अमित कागले, कार्तिक बचाटे, संतोष बाबर, नंदू भोरे, नामदेव गावडे उस्थित होते.