Mon, Jan 30, 2023

चैत्राली उत्तुरकरची परेडसाठी निवड
चैत्राली उत्तुरकरची परेडसाठी निवड
Published on : 20 January 2023, 12:07 pm
76970
----------
चैत्राली उत्तूरकरची
परेडसाठी निवड
इचलकरंजी : येथील चैत्राली अतूल उत्तूरकर हिची प्रजासत्ताक दिनाच्या परेड कार्यक्रमासाठी निवड केली आहे. सांस्कृतिक मंत्रालयातर्फे देशपातळीवर स्पर्धा घेऊन सुमारे पाच हजार विविध नर्तकांमधून मनीषा नृत्यालय, पुणे यांची कथक हा शास्त्रीय नृत्यप्रकार सादर करण्यासाठी निवड केली आहे. ग्रुपमध्ये चैत्रालीचा समावेश केला आहे. येथील नृत्यगुरू सौ. सायली होगाडे यांच्या पदन्यास नृत्यकला अकादमीची ती माजी विद्यार्थिनी आहे. चैत्राली ही सध्या पुणे येथे प्रसिद्ध नृत्यगुरू पंडिता मनीषाताई साठे यांच्याकडे सहा वर्षांपासून पूर्ण वेळ कथक नृत्याचे प्रशिक्षण घेत आहे.