
घोडावतने घेतले स्टार्टअप विकत
‘टू बी ऑनेस्ट’ स्टार्ट-अप
‘घोडावत’ने घेतले विकत
जयसिंगपूर, ता. २०: घोडावत कंझ्युमर लिमिटेड (जीसीएल) ने दिल्लीस्थित स्टार्ट-अप ''टू बी ऑनेस्ट'' विकत घेतले आहे. टीबीएच हे आरोग्यास पोषक व दर्जेदार फळभाज्यापासून तयार केलेले स्नॅक्स श्रेणीत येते.
आयआयटी आणि आयआयएम पदवीधर, मयंक गुप्ता, रितिका अग्रवाल आणि अनुज घंघोरिया यांनी २०१७ मध्ये टीबीएच स्थापन केले. टीबीएच हे भारतातील फळभाज्यापासून तयार केलेले स्नॅक्स श्रेणीत आघाडीवर आहे. या उपक्रमामागील दृष्टीकोन म्हणजे ग्राहकांना खाद्यपदार्थांच्या विविध पर्यायांची श्रेणी उपलब्ध करून देणे. टीबीएच ठराविक व कमी कॅलरी मॉडेलच्या पलीकडे जाऊन स्वादिष्ट व आरोग्यास फायदे देणारे उत्पादने प्रदान करते. टीबीएच नाविन्यपूर्ण व्हॅक्यूम कुकिंग प्रक्रियेसह, स्नॅक्स कच्च्या भाज्या आणि फळांचे नव्वद टक्केपेक्षा जास्त पोषकता राखून ठेवते.
सध्या या श्रेणीमध्ये, भेंडी, राईप जॅकफ्रूट, तारो, पिकलेले केळी, गोल्डन स्वीट बटाटा, बीटरूट, मिश्र रताळे, चणे आणि टोमॅटो यासह दहा भिन्न प्रकार आहेत. अलीकडेच टीबीएचने रेडी-टू-कुक श्रेणीमध्ये आणखी एक नाविन्यपूर्ण उत्पादन रेडी-टू-कूक स्प्राउट्ससह मसूर आणि सुपरफूड बनवले आहे. हे सोलर-डिहायड्रेटेड स्प्राउट्स आहेत. जे पाच मिनिटांत सहज हायड्रेट केले जाऊ शकतात. ज्यामुळे अंकुरित पदार्थांची पोषाकता अबाधित राहतात. जीसीएलने सतत उत्पादनात नावीन्यता आणून ग्राहक केंद्रितता, परवडण्याची क्षमता आणि गुणवत्ता यावर लक्ष केंद्रित केले आहे.