खाद्यतेले, भाजीपाला अन्‌ गुळाची ढेप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खाद्यतेले, भाजीपाला अन्‌ गुळाची ढेप
खाद्यतेले, भाजीपाला अन्‌ गुळाची ढेप

खाद्यतेले, भाजीपाला अन्‌ गुळाची ढेप

sakal_logo
By

77451
कोल्हापूर : हिरव्या वांग्यांची आवक कमी झाल्याने लक्ष्मीपुरी मंडईत दर वाढले होते.

हिरवे वांगे ८० रुपये किलो!
---
काळा घेवडा, वरणा, ढब्बूचे दरही वधारले
कोल्हापूर, ता. २२ : एका ठराविक काळानंतर हिरवी वांगी ८० ते १२० रुपये किलोपर्यंत जातात. मग, हिरव्या वांग्यांची आवक वाढली, की दर ४० रुपये किलोपर्यंत येतात. हिरव्या वांग्यांच्या दरात असे चढ-उतार होत असतात. निळसर अन्‌ काळे तसेच हिरवे असे दोन प्रकार वांग्यांचे पाहायला मिळतात. यातील हिरव्या वांग्यांना अधिक मागणी असते. निळसर वांगे काहीसे तुरट लागते म्हणून ते घेतले जात नाही. मात्र, हिरव्या वांग्यांचा दर वधारला, की नाईलाज म्हणून अनेक जण निळसर वांगे घेतात. याबरोबर काळा घेवडा, वरणा शेंग, ढब्बूचे दरही वाढलेले दिसतात.
...
चौकट
भाज्यांचे दर (प्रतिकिलो रुपये)
खुटवडा शेंग *६०
काळा घेवडा *८०
ढब्बू मिरची *७०
वरणा शेंग *८०
भेंडी *८०
दुधी भोपळा *१० रुपयांना एक नग
बंदरी गवारी *८०
हिरवा वाटाणा *५०
हिरवी वांगी *८०
देशी काकडी *६०
काटे काकडी *६०
वाल शेंग *८०
कारली *४०
उसावरील घेवडा शेंग *८०
फ्लॉवर *२० रुपयांना एक नग
कोबी *१०/२० रुपयांना एक नग
देशी गाजर *४०
पापडी शेंग *६०
बिनिस *६०
काळी वांगी *५०/६०
हिरवी मिरची *६०
आल्लं *६०
टोमॅटो *१०/१५
हेळवी कांदा *१०
बटाटा *२०
पांढरा कांदा *१७
ब्रोकोली *५० रुपये गड्डा
कलरफूल कोबी गड्डा *२०
केळ फुल गड्डा *३०/४०
हिरवी कच्ची केळी *४०/५०
चवदार शेंग *४०
घोसावळे *४०
तोंडली *४०
पडवळ (आकारमानानुसार) *१०/२० रुपये नग
दोडका *४०
लसूण *१०० रुपयांना दीड किलो
सुरण गड्डा *८०
आळू गड्डा *८०
लाल बीट *५/१०
मुळा *५/१०
शेवगा शेंग *२० रुपयांना तीन शेंगा
...
चौकट
पालेभाजी (प्रति पेंडी)
कोथिंबीर *१० रुपयांना दोन पेंड्या
मेथी *१०
कांदापात *१०/१५
शेपू *१०
आंबाडा *१०
तांदळी *१०
लाल माट *१०
आंबट चका *१०
पुदीना *५/१०
कढीपत्ता *५/१०
चाकवत *५/१०
करडई *५/१०
पालक *५/१०
...
ठळक चौकट
सोने-चांदीचे दर‌ (प्रतिकिलो/प्रतितोळा) (रविवारी सायंकाळी साडेपाचपर्यंत घेतलेले दर)
सोने---------------- प्रतितोळा
चांदी---------------- प्रतिकिलो
...
ठळक चौकट
मिरचीचे दर (प्रतिकिलो)
ओरिजनल कर्नाटकी ब्याडगी *६५० ते ८००
सिजेंटा ब्याडगी *४५० ते ६००
एमपी दिल्लीहाट ब्याडगी *३५० ते ४५०
लाली ब्याडगी *३०० ते ४५०
संकेश्‍वरी प्युअर *१४०० ते १८००
साधी जवारी *३५० ते ४५०
लवंगी *३०० ते ३५०
काश्‍मिरी *६०० ते ७५०
गरुडा *३५० ते ४००
...
ठळक चौकट
धान्य-कडधान्य‌ (प्रतिकिलो रुपये)
ज्वारी *४०/६०
गहू *३८/४५
रत्नागिरी तांदूळ *४५/५०
एचएमटी तांदूळ *५०
कोलम तांदूळ *६०/६५
कर्जत तांदूळ *२८/३०
आंबे मोहोर *८०
घनसाळ तांदूळ *७५
हरभराडाळ *७०/७५
तूरडाळ *११५/१२०
मसूरडाळ *९५
मूगडाळ *११५/१२०
उडीदडाळ *१२०
मटकी *१००/१६०
चवळी *८०/९०
मसूर *९०/२६०
हिरवा वाटाणा *७०/८०
काळा वाटाणा *८०
पावटा *२००/२१५
हुलगा *८०/८५
हिरवा मूग *९५/१००
पोहे *४५
शेंगदाणे *१२०/१३०
साबूदाणे *६५/७०
साखर *४०
...

लिड
पूर्वी कोणीही किराणा मालाच्या दुकानात गेले, की शेंगतेल द्या, असे सांगितले जायचे. आज मात्र खाद्यतेलाची ही स्थिती नक्कीच नाही. फक्त शेंगतेलच नाही, तर कोल्हापूरमध्ये १५ प्रकारची खाद्यतेले उपलब्ध आहेत. लोकही ‘हेल्थ कॉन्शेस’ झालेत. ब्रॅन्डेड तेल भलेही महाग असू देत. लोक ते हटके घेतात. आहारात वापर करतात. काही तर मोजून-मापूनच फोडणीत तेल घालतात. अशा या खाद्यतेलाचा कोल्हापुरातला नेमका ट्रेंड कसा आहे, याचा आढावा...
...
- अमोल सावंत


ैहे खाद्यतेल स्वस्त कसे?
सर्वच खाद्यतेलांचे दर वाढले. पण, पामचे रिफाइंड असलेले ओलीन तेलाचे पॅकेट्‌स १२० रुपयांना मिळते. अनेकांना आश्‍चर्य वाटते, की हे तेल इतके कसे स्वस्त? हे तेल हॉटेल व्यावसायिक, फरसाणा निर्मिती करणारे अधिक प्रमाणात घेतात.

गोल चार्ट
कोल्हापुरात अधिक विक्री
- सरकी : ६० टक्के
- सनफ्लॉवर तेल : २० टक्के
- शेंगतेल : २० टक्के

ऑलिव्हचा ट्रेंड
भूमध्य समुद्री परिसरात ऑलिव्ह बियांचे उत्पादन होते. या ऑलिव्ह बियांपासून तेल तयार केले जाते. कोलेस्टेरॉल मुक्त, वजन कमी करण्यासाठी ते वापरले जाते. डायटेशियन्स्‌, बॉडी बिल्डर्स, खेळाडू, ॲथलेटिक्स्‌, कॉस्मेटिक्स्‌ तज्ज्ञ, डाएट कॉन्शेस लोक या तेलाचा वापर करू लागले आहेत. ऑलिव्ह तेल घेण्याचे प्रमाण दहा टक्के आहे. यात एक्स्ट्रा व्हर्जीन, एक्स्ट्रा लाइट, पोमॅस असे प्रकार आहेत. एक्स्ट्रा व्हर्जीन, एक्स्ट्रा लाइट प्रकार ९९० रुपये लिटरने, तर पोमॅस ५९० रुपये लिटरने विकले जाते.

लाकडी घाण्याचा अवतार
लाकडी घाणा तेल घेण्याचाही ट्रेंड अधिक आहे. कारण २० ते २५ टक्के ग्राहक लाकडी घाण्याशी जोडले आहेत. सध्या ३१० रुपये लिटरने विक्री सुरू असून, ते महाग आहे. कारण, यासाठी लागणारी यंत्रे वेगळी असून, ते फिल्टर केलेले नसते. जसे आहे, तसे नैसर्गिक अवस्थेत ते मिळते. उत्पादन जास्त नसल्याने दर जास्त राहतो. एकट्या लाकडी घाण्यात १३ प्रकारच्या व्हरायटीज उपलब्ध आहेत.

तेलांचे प्रकार
राईसब्रान, तीळ, मोहरी, खोबरेल, बदाम, अक्रोड, जवस, एरंडेल, ब्लॅक सीड (करंजी), शेंगतेल, सूर्यफूल, करडई अशा प्रकारची खाद्यतेले मिळतात.

शेंगतेलाची विक्री कमी का?
शेंगतेलाला खमंग वास येतो. अनेकांना हा वास सहन होत नाही. शिवाय, तेलाचा दर जास्त आहे. १९६ रुपये किलोने विक्री होते. हृदयरोगाशी संबंधित लोक हे तेल घेत नाहीत. अन्य तेलांचा पर्याय स्वीकारतात.

ऑईल मिल किती?
शहर परिसरात तीन ते चार, तर जिल्ह्यात अंदाजे पाच ते सहा ऑईल मिल आहेत.
...

कोट‌
दररोजच्या वापरातील खाद्यतेलांबरोबर आता बदाम, अक्रोड तेलही उपलब्ध आहे. अशी खाद्यतेले घेणारा एक वर्ग शहरात आहे. ज्यांना अन्य प्रकारची तेल उपलब्ध आहेत, तेही आम्ही देतो.
- श्रीतेज अथणे, व्यापारी, श्री ऑईल मिल