Mon, October 2, 2023

टुडे १ सं
टुडे १ सं
Published on : 22 January 2023, 4:31 am
इचलकरंजीमध्ये
आजपासून व्याख्यानमाला
इचलकरंजी : येथे सोमवार (ता.२३) पासून गुरुवर्य रविंद्रनाथ टागोर व्याख्यानमाला सुरू होणार आहे. मराठी भाषा संवर्धन उपक्रम अंतर्गत महानगरपालिकेतर्फे गुरुवर्य रविंद्रनाथ टागोर व्याख्यानमालेचे यंदाचे १५ वे वर्ष आहे. श्रीमंत नारायणराव बाबासाहेब घोरपडे नाटयगृह येथे सायंकाळी ६ ते ८ यावेळेत व्याख्याने होणार आहेत. सोमवारी (ता.२३) अजिम नवाज राही हे मी आणि माय मराठीची आभाळ या विषयावर बोलणार आहेत. मंगळवारी (ता.२४) संदीप खरे यांचे मौनांची भाषांतरे या विषयावर तर बुधवारी (ता.२५) कस्तुरी सावेकर ही माउंट एव्हरेस्ट- एक रोमांचकारी अनुभव या विषयावर अनुभव प्रकट करणार आहे.