
चांगले काम करणाऱ्यांना सहकार्य करा
chd235.jpg
77744
कोळींद्रे ः विकासकामांचे उद्घाटन करताना आमदार राजेश पाटील. शेजारी अल्बर्ट डिसोझा, सरपंच वंदना सावंत, जनार्दन बामणे आदी.
---------------------------------------
चांगले काम करणाऱ्यांना सहकार्य करा
आमदार राजेश पाटील; कोळींद्रे येथे विविध विकासकामांचे उद्घाटन
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. २३ ः अलिकडच्या काळात विकासकामांपेक्षा निवडणुकीच्या काळात पैसे वाटणारे प्रतिनिधी निवडून येत आहेत. यामुळे चांगले काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींचे खच्चीकरण होते. पर्यायाने समाजाचेही नुकसान होते. नागरीकांनी चांगले काम करणाऱ्यांच्या मागे राहून सामाजिक विकास साधायला हवा, असे मत आमदार राजेश पाटील यांनी व्यक्त केले.
कोळिंद्रे (ता. आजरा) येथे आमदार निधीतून मंजूर झालेल्या विविध विकासकामांचे उद्घाटन त्यांच्याहस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. सरपंच वंदना सावंत अध्यक्षस्थानी होत्या. गावात अंतर्गत रस्त्यासाठी १८ लाख, कोळींद्रे ते नेसरी रस्त्यासाठी ७५ लाख, पोश्रातवाडी (ता. आजरा) येथे अंतर्गत रस्ता खडीकरण व डांबरीकरणासाठी पाच लाख रुपये मंजूर झाले होते. ही कामे पूर्ण झाली. त्याचे आमदार पाटील यांच्याहस्ते लोकार्पण केले. आमदार पाटील पहिल्यांदाच गावात आल्याने ग्रामस्थांतर्फे त्यांचा सत्कार झाला. ग्रामपंचायतीच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा सत्कार आमदार पाटील यांच्या हस्ते झाला.
माजी खासदार कै. सदाशिवराव मंडलिक, माजी आमदार कै. नरसिंगराव पाटील, माजी विधानसभा अध्यक्ष कै. बाबासाहेब कुपेकर यांच्या विचारांचा अंगीकार करुन मी समाजकार्यात कार्यरत आहे. यापुढील काळातही या विभागातील विकासकामांना माझे नेहमीच पाठबळ राहिल, असे आश्वासन त्यांनी दिले. माजी सभापती अल्बर्ट डिसोझा यांनीही मनोगत व्यक्त केले. अभय देसाई, एस. एल. पाटील, जनार्दन बामणे, एम. एस. पाटील, शंकर उगाडे, सुरेश करडे, तानाजी बुगडे, गोविंद नारळकर, विजय कांबळे, ग्रामसेवक विक्रमसिंह देसाई, रेखा जाधव, मेघा जाधव, सुभाष सावंत उपस्थित होते. प्रा. सुरेश बुगडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. जयराम संकपाळ यांनी आभार मानले.