
शहर
77801
सुसंस्कार हायस्कूलचे यश
कोल्हापूर : माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद कोल्हापूर व प्राथमिक शिक्षण समितीतर्फे प्रायव्हेट हायस्कूलमध्ये झालेल्या ५० व्या शहर विज्ञान प्रदर्शनात कदमवाडी भोसलेवाडी येथील सुसंस्कार हायस्कूलने यश मिळविले. नववीचा विद्यार्थी प्रणव शंकर तारदाळे यांनी तयार केलेल्या ‘पाणी स्वच्छ करणारी’ उपकरणास उत्तेजनार्थ क्रमांक मिळाला. सुजल सागर पाटील यांने विज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल त्यांचा माध्यमिक उपशिक्षणाधिकारी दिगंबर मोरे, मनपा प्रशासनाधिकारी शंकर यादव, उपायुक्त शिल्पा दरेकर यांच्या हस्ते सत्कार केला. विद्यार्थ्यांना विज्ञान शिक्षिका जकिया मगदूम, शिक्षक गजानन गुरव यांचे मार्गदर्शन लाभले. सुसंस्कार शिक्षण मंडळाचे अध्यक्ष रियाज मगदूम, सचिव सौ. रुबीना अन्सारी, मुख्याध्यापक विजय भोगम व संस्थेचे पदाधिकाऱ्यांचे प्रोत्साहन लाभले.